You are currently viewing येणार्‍या विधानसभा,लोकसभा निवडणुकीत जनतेला सोबत घेवून जिल्ह्यातील सत्तेत असणारे आमदार आणि खासदारांना मनसे पाडणार ही काळ्या दगडावरची रेघ -विनोद सांडव

येणार्‍या विधानसभा,लोकसभा निवडणुकीत जनतेला सोबत घेवून जिल्ह्यातील सत्तेत असणारे आमदार आणि खासदारांना मनसे पाडणार ही काळ्या दगडावरची रेघ -विनोद सांडव

सत्ताधाऱ्यांच्या चाललेल्या नौटंकीची पोलखोल मनसे करणारच

राज ठाकरेंची सत्ता रस्त्यावरच-मनसेचा टोला

कोण बाळा पावसकर ?? कुडाळचे की मालवणचे ?? स्वताचे नाव न घालणारे असे बाळा पावसकर खूप आहेत.हिम्मत असेल तर तालुका कोणता हे स्पष्ट करावे.स्वतःचे नाव पूर्ण न घालणार्‍या व्यक्तीने मनसेवर टीका करू नये.

कुडाळमधील विनयभंग प्रकरणात लोकांकडुन ‘चपटी’ मिळालेले बाळा असतील तर त्यांनी मनसेच्या नादी लागु नये.खंडणीचा चुकीचा आरोप न करता स्वतःचे चारित्र्य जपावे.

मनसे सुशिक्षित लोकांचा पक्ष आहे.मनसेचे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते सुशिक्षित आहेत.माहितीच्या अधिकारात मनसे पुराव्यानिशी पोलखोल करत आहे ते सेनेच्या नेत्यांना झोंबत आहे.मनसे रस्त्यावर लढणारा पक्ष आहे.जनतेला अपेक्षित न्याय देणारा पक्ष आहे.मनसेची सत्ता रस्त्यावरच हे राजसाहेबांनी वेळोवेळी स्पष्ट केलेले आहे.जी शिवसेनेची पूर्वीची भूमिका होती जनतेला न्याय द्यायचा आणि सत्ताधार्‍यांवर तुटून पडायच आणि सत्ताधार्‍यांना चुका दाखवायच्या तीच भूमिका आज मनसे राबवत आहे.दुर्दैवाने बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या कोंग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली वाभाडे काढले त्यांच्यासोबतच शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी हातमिळवणी केली आणि लाचारासारखे कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसण्याचे काम केले.

जिल्ह्यातील ढासळलेली आरोग्य व्यवस्था,महामार्गाचे निकृष्ट काम,अवैध आणि अनैतिक चालणारे धंदे, बांधकाम खात्यातील ठेकेदार आणि अधिकारी यांचा सगनमताने , चाललेला भ्रष्टाचार,रस्त्यांच्या खड्ड्याचा प्रश्न,अनधिकृत वाळु व्यवसाय यासारख्या अनेक जनतेच्या प्रश्नांवर मनसे नेते परशुराम उपरकर यांनी सातत्याने आवाज उठवत आहेत,सेना नेत्यांचे वस्त्रहरण करत आहेत त्यामुळे बिथरलेल्या शिवसेना आमदारांना ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या घरी जाऊन शिवसेनेतून उभे राहण्यासाठी का विनवणी करायला लागत आहे? त्यांना उभे राहण्यासाठी पैशांची का प्रलोभने दाखवत आहेत? याचे आत्मपरीक्षण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी करावे.

मनसे मराठी माणसांसाठी मराठी माणसांसाठी स्थापन झालेला पक्ष आहे.जनतेच्या प्रश्नांसाठी स्थापन झालेला पक्ष आहे. तेच काम जिल्ह्यातील मनसे करत आहे.लोकशाहीत निवडणुकीपेक्षा सत्ताधार्‍यांवर अंकुश ठेवणे आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावणे हे काम मनसे करत आहे त्यामुळे येणार्‍या काळात मनसे अधिक आक्रमक होवून पालकमंत्री,आमदार,खासदार करत असलेल्या नौटकीची पोलखोल करणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे हे सेना नेत्यांनी ध्यानात ठेवावे.

निवडणूकला उभे राहून आमदार खासदारांनी काय दिवे लावले हे जनतेला माहीत आहे.सत्तेचा उन्माद असला की नेत्यांना जनता घरी बसवते हा इतिहास आहे.नारायण राणे,सुरेश प्रभू,मधु दंडवते,नाथ पै या सारख्या दिग्गजांना पण घरी बसावे लागले आहे. हा इतिहास आहे.पण भविष्यात येणार्‍या निवडणुकीत जनतेला सोबत घेवून जिल्ह्यातील मनसे सत्तेतील आमदार आणि खासदारांना पाडणार असेही विनोद सांडव यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा