You are currently viewing पीठासीन अधिकारी वंदना खरमाळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा..

पीठासीन अधिकारी वंदना खरमाळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा..

मालवण :

मालवण पालिकेच्या विषय समिती सभापतींच्या निवडीत बांधकाम, नियोजन समिती सभापतिपदी मंदार केणी, महिला बालकल्याण समिती सभापतिपदी शीला गिरकर, तर आरोग्य, पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक समिती सभापतिपदी दर्शना कासवकर यांची बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी तथा प्रांत वंदना खरमाळे, कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाडवे यांनी ही निवड जाहीर केली.

पालिकेच्या विषय समिती सभापती निवडीसाठी मंगळवारी पालिकेत प्रांत तथा पीठासीन अधिकारी वंदना खरमाळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, यतीन खोत, मंदार केणी, आकांक्षा शिरपुटे, सेजल परब, तृप्ती मयेकर, शीला गिरकर, दर्शना कासवकर, सुनीता जाधव, पूजा करलकर, ममता वराडकर, पूजा सरकारे, जगदीश गावकर, दीपक पाटकर, उपनगराध्यक्ष राजू वराडकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, सुदेश आचरेकर, पंकज सादये आदी नगरसेवक उपस्थित होते.

गतवर्षीप्रमाणे यावर्षीच्या निवडीतही गटनेतेपदाच्या विषयावरून वाद वाढण्याची चिन्हे निर्माण झाली असताना, जिल्हाधिकाऱ्यांनी उमेदवारांना सर्व सदस्य मतदान करतील, असे निर्देश दिले. यामुळे शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. अशातच शिवसेना-भाजप गटाचे गटनेते गणेश कुशे यांनी ही निवडणूक रद्द करण्यात यावी अशी हरकत नोंदविली. मात्र, पीठासीन अधिकाऱ्यांनी कुशे यांची हरकत फेटाळून लावली.

प्रत्येकी एका सदस्याने उमेदवारी दाखल केल्याने त्यांचे अर्ज वैध ठरवून त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. पाणीपुरवठा समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून उपनगराध्यक्ष राजन वराडकर, तर सदस्य म्हणून यतीन खोत यांची निवड करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा