You are currently viewing तेरवण येथे निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिर संपन्न 

तेरवण येथे निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिर संपन्न 

तेरवण येथे निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिर संपन्न

दोडामार्ग

सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि दोडामार्ग तालुक्यातील तेरवण ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तेरवण गावात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या वैद्यकिय सेवाभावामुळे तेरवणवासिय भारावून गेले. चंदगड आणि दोडामार्ग तालुक्याच्या सिमेवर अतिदुर्गमस्थानी असलेल्या तेरवण गावात हे पहिलेच आरोग्य शिबिर झाले. या शिबिराचा १३० जणांनी लाभ घेतला.
तेरवण गावचे ग्रामदैवत श्री सातेरी भावई मंदिराच्या सभामंडपात घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्द्घाटन सावंतवाडीच्या जिवनरक्षा हॉस्पिटलचे डॉ शंकर सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सिंधुमित्र प्रतिष्ठानचे डॉ प्रविणकुमार ठाकरे, फिजिशियन डॉ नंददिप चोडणकर, नेत्र रोग तज्ञ डॉ स्वाती पाटील, स्त्रि रोग प्रसुती तज्ञ डॉ अंकिता मसुरकर, डॉ सौ मुग्धा ठाकरे, डॉ राहुल गव्हाणकर, माणगांवच्या परब हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ चेतन परब, सामाजिक युवा कार्यकर्ते विजय गवस, मानकरी जयराज गवस, माजी सैनिक सोमा गवस, सदाशिव गवस, तुकाराम गवस, नागेश नाईक, संतोष गवस, दत्ताराम गवस, राजाराम गवस, मिरवेल सरपंच संतोष पवार, माजी सरपंच विद्याधर बाणे, नामदेव गवस, शंकर कृष्णा गवस, रोहन सावंत, ओमकार गवस, अपर्णा गवस, गोपाळ गवस आदी उपस्थित होते.
या शिबिरात शल्यचिकित्सक डॉ शंकर सावंत, फिजिशियन डॉ नंददिप चोडणकर, नेत्र रोग तज्ञ डॉ स्वाती पाटील, स्त्रि रोग प्रसुती तज्ञ डॉ अंकिता मसुरकर, डॉ सौ मुग्धा ठाकरे, डॉ प्रविणकुमार ठाकरे, डॉ राहुल गव्हाणकर, फिजिशियन डॉ नंददीप चोडणकर, डॉ चेतन परब यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात रुग्णांची ब्लड शुगरचीही तपासणी करण्यात आली. त्यानंतर रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली.
यावेळी अतिदुर्गम तेरवण गावात निःशुल्क निदान व चिकित्सा सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल तेरवण ग्रामस्थांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या आरोग्य सेवेच्या उपक्रमाचे कौतुक करीत सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले. या शिबिराचे नियोजन सिंधुमित्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अँड्र्यू फर्नांडिस, आनंद साधले, भगवान रेडकर, दीपक गावकर, सिद्धेश मणेरीकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा