You are currently viewing नारायण राणे यांच्या विजयानंतर कोकणात कमळ फुलले

नारायण राणे यांच्या विजयानंतर कोकणात कमळ फुलले

*कोकणच्या विकासाला मिळणार चालना*

 

सावंतवाडी :

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मोठा विजय कोकणात झाला. त्यांच्या रूपाने मतदारसंघात कमळ फुलले आहे. इथल्या जनतेच्या व कोकणच्या विकासासाठी ते पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री होतील असा विश्वास भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्यक्त केला. तर लोकसभेच्या पराभवाचा वचपा नारायण राणेंनी काढला आहे. येणाऱ्या विधानसभेत निलेश राणे देखील पराभवाचा वचपा काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, कोकणी जनतेने राणेंना साथ दिली याबदल मी मनापासून आभार मानतो. नक्कीच येणाऱ्या काळात राणेंच्या माध्यमातून तरुणांचा असलेला बेरोजगारीचा प्रश्न सोडवला जाणार आहे. जिल्ह्यात कशा प्रकारे मोठ्या इंडस्ट्री येऊन आमच्या तरुणांना रोजगार या ठिकाणीच मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नारायण राणे दहा वर्षांत न झालेला विकास करून दाखवतील असा विश्वास भाजप युवा नेते तथा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी वक्त केला.

दरम्यान, शहरात झालेल्या कमी मतदानाचे आम्ही आत्मपरीक्षण करून येणाऱ्या सर्व निवडणुकीत आम्ही योग्य पद्धतीने नियोजन करून सर्वाधिक मत शहरातून मिळवण्याचं प्रयत्न करू असा विश्वास देखील विशाल परब यांनी व्यक्त केला. तर यावर आत्मचिंतन करुन भविष्यात हे मताधिक्य वाढवू अस मत माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी व्यक्त केले.

दरम्यान, २०१४ व २०१९ च्या पराभवाचा वचपा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठ्या मताधिक्याने निवडून येत काढला आहे. आमचे नेते निलेश राणे येणाऱ्या काळात कुडाळ-मालवण मतदारसंघातून नारायण राणेंच्या पराभवाचा देखील वचपा काढतील असा विश्वास विशाल परब यांनी करत वैभव नाईक यांना इशारा दिला आहे. याप्रसंगी माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, चराठा उपसरपंच अमित परब, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा