*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सोनवर्खिला ग्रीष्म !*
दाह ग्रीष्माचा सहाया
वा-याने कुस बदलली
स्वतःच लावल्या चाली अन्
गाणी फुलांना !गायाला लावली
धरणीवर गंधर्वांनी झुला बांधला
नववधू बावरी!हळदीने माखली
पीतांबर नेसून अवतरला युगंधर
झोके घेत!रम्य मेखला लाजली
सोनवर्खिले झुंबर लेवून
सांज पाचूचा चढवला
नाचे हिरवीपर्णे झुळकीसंगे
भूलोकी ग्रीष्म झळकला
ग्रीष्मा!अतरंगी तू!अविरत तू
दिगंत व्यापलेली !तुझी आभा भ्रुकुटीच्या आकुंचनाने!आकाशी
मस्तकी धारण तुझी प्रभा…..!!
ताप सुर्याचा दाह सोसुनी धरणी झाली रूक्ष भेगाळलेली
उफाट ऊत काहिलीला आला
दाहात खचून ईशकृपेस आसावली!
बाबा ठाकूर धन्यवाद