केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विजयानंतर वैभववाडीत जल्लोष
वैभववाडी
कोकणचे भाग्यविधाते, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विजयानंतर वैभववाडी भाजपच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला. येथील भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. नारायण राणे आगे बढो… भारतीय जनता पार्टीचा…..अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. वैभववाडी भाजपा कार्यालय ते दत्त मंदिर अशी विजयी रॅली काढण्यात आली. दत्त मंदिरात जाऊन कार्यकर्त्यांनी आशीर्वाद घेतले. यावेळी कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, माजी सभापती अरविंद रावराणे, सुधीर नकाशे, नवलराज काळे, उत्तम सुतार, बाबा कोकाटे, राजू पवार व मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.