*टी२० विश्वचषकातील अफगाणिस्तानचा चौथा मोठा विजय, युगांडाचा १२५ धावांनी पराभव*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
फजलहक फारूकीच्या पाच विकेट्सच्या जोरावर अफगाणिस्तानने युगांडाचा १२५ धावांनी पराभव करत टी२० विश्वचषकात मोठा विजय नोंदवला. पुरुषांच्या टी२० विश्वचषकातील कोणत्याही संघाचा हा चौथा सर्वात मोठा विजय आहे. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना रहमानुल्लाह गुरबाजच्या ७६ धावा आणि इब्राहिम जादरानच्या ७० धावांच्या जोरावर २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १८३ धावा केल्या. प्रत्युत्तरात युगांडाचा संपूर्ण संघ १६ षटकांत ५८ धावांत गडगडला. रियाजत अली शाह आणि रॉबिंसन ओबुया यांच्याशिवाय युगांडाचा अन्य कोणताही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही. युगांडाकडून रॉबिंसनने सर्वाधिक १४ धावा केल्या. फारूकीशिवाय नवीन उल हक आणि कर्णधार राशिद खानने प्रत्येकी दोन बळी घेतले.
युगांडाचा विश्वचषकातील हा पहिलाच सामना होता आणि संघ प्रभावित करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला. युगांडाने पुरुषांच्या टी२० विश्वचषकातील चौथ्या क्रमांकाची सर्वात कमी धावसंख्या पोस्ट केली. या जागतिक स्पर्धेत सर्वात कमी धावसंख्या करण्याचा विक्रम नेदरलँडच्या नावावर आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना युगांडाची सुरुवात खूपच खराब झाली आणि पहिल्याच षटकात संघाने दोन विकेट गमावल्या. युगांडाचा संघ शेवटपर्यंत या धक्क्यांमधून सावरू शकला नाही आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
अफगाणिस्तानकडून फजलहक फारूकीने शानदार कामगिरी करत पाच बळी घेतले. यासह फजलहक हा अफगाणिस्तानचा टी२० सामन्यात पाच विकेट घेणारा पाचवा गोलंदाज ठरला. त्याच्या आधी राशिद खान, करीम जनत, समिउल्लाह शिनवारी आणि मुजीब उर रहमान यांनी ही कामगिरी केली आहे. फारूकीची ही कामगिरी अफगाणिस्तानसाठी टी२० मधील गोलंदाजाची दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. फारूकीने आपल्या स्पेलमध्ये केवळ नऊ धावा दिल्या.
तत्पूर्वी, युगांडाने नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जादरान आणि गुरबाज या जोडीने अफगाणिस्तानसाठी चमकदार कामगिरी केली. या दोन फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी १५४ धावांची भागीदारी करत अफगाणिस्तानला दमदार सुरुवात करून दिली. या दोन फलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावरच अफगाणिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. जादरान आणि गुरबाज यांनी तुफानी फलंदाजी केली आणि दोघांनीही अर्धशतके झळकावली. टी२० विश्वचषकात अफगाणिस्तानने शतकी भागीदारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र युगांडाचा कर्णधार मसाबाने जादरानला बाद करून ही भागीदारी भेदली. यानंतर युगांडाने शानदार पुनरागमन करत अफगाणिस्तानला सतत धक्के दिले. सरतेशेवटी अफगाणिस्तानचे फलंदाजीचे आक्रमण फसले आणि अखेरच्या सहा षटकांत संघाला एकही चौकार लगावता आला संवाद मिडिया* 👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕ *📢प्रवेश सुरू…!! 📢प्रवेश सुरू…!!📢प्रवेश सुरू…!!*📣📢 *_⚕नर्सिंग असिस्टंट कोर्स साठी प्रवेश सुरू…!!👩⚕👩⚕_* *☸️राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी☸️ मध्ये प्रवेश सुरू…!!💫* https://sanwadmedia.com/137110/ *✍️ शैक्षणिक पात्रता:-* ▪️१० किंवा १२ पास ▪️वय १८ ते ४५ ▪️कोर्सचा कालावधी नऊ महिने _👉 ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी कमी फी मध्ये 100% शासनमान्य नर्सिंग असिस्टंट कोर्स सर्टिफिकेट…!!_ _👉प्रायव्हेट हॉस्पिटल, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, हेल्थ केअर सेंटर, एनजीओ संस्था या ठिकाणी नोकरीची संधी…!!_ …!!👩⚕👩⚕ _👉होम बेस केअर व्यवसाय सुरू करण्याची संधी…!!_ …!!👩⚕👩⚕ *👩🔬नर्सिंग असिस्टंट कोर्सची वैशिष्ट्ये:-* _🔸शासनमान्य सर्टिफिकेट 📑_ _🔹सोईस्कर ट्रेनिंग शेड्युल 📈_ _🔸अनुभवी तज्ञाचिकित्सांचे मार्गदर्शन 👨⚕️_ *_📌मर्यादित जागा, त्यामुळे आजच संपर्क करून आपली जागा बुक करा…!!_* *🏥आमचा पत्ता:-*👇 *राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी खासकीलवाडा सुतिकागृह परिसर.* *☎️संपर्क:-*👇 *०२३६३-२७२३०२/२७२०८५/* *📲९४२११४६७९७* *📲९४०४७४०६०६* *जाहिरात लिंक*👇 https://sanwadmedia.com/137110/ ———————————————— *संवाद मीडिया* *वेबसाईट* : https://sanwadmedia.com/ *फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia *चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia ========================= *📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क* *9421234663* नाही.
फजलहक फारूकीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
*संवाद मिडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*📢प्रवेश सुरू…!! 📢प्रवेश सुरू…!!📢प्रवेश सुरू…!!*📣📢
*_⚕नर्सिंग असिस्टंट कोर्स साठी प्रवेश सुरू…!!👩⚕👩⚕_*
*☸️राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी☸️ मध्ये प्रवेश सुरू…!!💫*
https://sanwadmedia.com/137110/
*✍️ शैक्षणिक पात्रता:-*
▪️१० किंवा १२ पास
▪️वय १८ ते ४५
▪️कोर्सचा कालावधी नऊ महिने
_👉 ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी कमी फी मध्ये 100% शासनमान्य नर्सिंग असिस्टंट कोर्स सर्टिफिकेट…!!_
_👉प्रायव्हेट हॉस्पिटल, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, हेल्थ केअर सेंटर, एनजीओ संस्था या ठिकाणी नोकरीची संधी…!!_ …!!👩⚕👩⚕
_👉होम बेस केअर व्यवसाय सुरू करण्याची संधी…!!_ …!!👩⚕👩⚕
*👩🔬नर्सिंग असिस्टंट कोर्सची वैशिष्ट्ये:-*
_🔸शासनमान्य सर्टिफिकेट 📑_
_🔹सोईस्कर ट्रेनिंग शेड्युल 📈_
_🔸अनुभवी तज्ञाचिकित्सांचे मार्गदर्शन 👨⚕️_
*_📌मर्यादित जागा, त्यामुळे आजच संपर्क करून आपली जागा बुक करा…!!_*
*🏥आमचा पत्ता:-*👇
*राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी खासकीलवाडा सुतिकागृह परिसर.*
*☎️संपर्क:-*👇 *०२३६३-२७२३०२/२७२०८५/*
*📲९४२११४६७९७*
*📲९४०४७४०६०६*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137110/
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*