वेंगुर्ला :
रत्नागिरी-सिंधदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर तालुका शिवसेनेच्या वतीने कॅम्प येथे जल्लोष करण्यात आला. यावेळी लाडू वाटून व फटाके फोडून घोषणा देत जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख उमेश येरम, युवा शहरप्रमुख संतोष परब, महिला शहरप्रमुख ऍड. श्रद्धा परब, संजय परब, सुशील परब, बाळा परब, सिल्वान डिसोझा, किरण कुबल, भाऊ वालावलकर, अप्पा मांजरेकर, गजानन गावकर, देविदास वालावलकर, मनाली परब, रसिका राऊळ, मनाली गोळम, गीतांजली गावकर, पुंडलिक हळदणकर, संजना पिंगुळकर, मनी रेवणकर, आदी उपस्थित होते. नारायण राणे यांनी केलेली विकासकामे यामूळे ते प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत. वेंगुर्ला तालुका पर्यटनदृष्ट्या विकसित होत असून पुढील 2 वर्षात राणे यांच्यामुळे निश्चितच वेंगुर्लेचा कायापालट होईल असा विश्वास येरम यांनी व्यक्त केला.