You are currently viewing नारायण राणेंचा विजय कोकण विकासाला नवसंजीवनी देणारा – भाजप जिल्हा प्रवक्ते विष्णू मोंडकर

नारायण राणेंचा विजय कोकण विकासाला नवसंजीवनी देणारा – भाजप जिल्हा प्रवक्ते विष्णू मोंडकर

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची राणे यांच्या विजयात किंगमेकरची भूमिका

 

मालवण :

 

कोकण विकासाठी गेले ३० वर्षापेक्षा कार्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाचा हा विजय असून या विजयामुळे कोकण विकासाला नवसंजीवनी मिळेल यात शंका नाही असे मत भाजपचे जिल्हा प्रवक्ते विष्णू ऊर्फ बाबा मोंडकर यांनी व्यक्त केले आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची भूमिका या विजयात किंगमेकर राहिली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे नियोजन तसेच अतुल काळसेकर, निलेश राणे, नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या विजयात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेना सर्व युतीच्या कार्यकर्त्यानी, नेत्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीचा हा विजय आहे. माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांना आत्मचिंतनाचा आहे. प्रत्येक वेळी दहशतीचा मुद्दा समोर करून प्रत्येक वेळी जनतेला दिशाहीन केले जात नाही हे मतदार संघाच्या जनतेने दाखवून दिले आहे. यापुढे कोकणच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, रोजगार विकासाचे पर्व सुरु होण्याचा मार्ग तयार झाल्याचे मत श्री. मोंडकर यांनी व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा