You are currently viewing मडुरा येथे पिकुळे येथील एकाचा मृतदेह आढळला…

मडुरा येथे पिकुळे येथील एकाचा मृतदेह आढळला…

मडुरा येथे पिकुळे येथील एकाचा मृतदेह आढळला…

बांदा

मडुरा -भरडवाडी साई मंदिर परिसरात दोडामार्ग-पिकुळे येथील एकाचा मृतदेह आढळून आला आहे. यशवंत लाडू गवस असे त्यांचे नाव आहे. ते काल पासुन बेपत्ता होते. दरम्यान आज साई मंदिर परिसरातील झुडपानजीक ते बेशुद्धावस्थेत आढळून आले. कोणी तरी मद्यधुंद अवस्थेत पडला असावा, असा संशय आल्याने अनेकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र उशिरा पर्यंत हालचाल न दिसल्यामुळे पोलिस पाटील नितीन नाईक यांनी तेथे जाऊन पाहणी केली असता ते मृत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
ते मूळ विक्रोळी-मुंबई येथील आहेत. त्या ठिकाणी ते रिक्षा व्यवसाय करत होते. ते २ दिवसांपूर्वी या ठिकाणी आपल्या कुटुंबासह आले होते. काल सकाळी पेपर आणायला जातो, असे सांगून ते घरातून बाहेर पडले होते. मात्र आज त्यांचा मृतदेह आढळून आला. आता त्यांचा नेमका मृत्यू नेमका कसा झाला? हे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे. याबाबतची माहिती मिळताच बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पंचनामा सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा