देवगड
देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतींच्या निवडणुका होवून बांधकाम सभापतीपदासाठी बापू जुवाटकर, शिक्षण व आरोग्य सभापती पदासाठी संजय तारकर, महिला व समाजकल्याण सभापतीपदी प्राजक्ता घाडी, उपसभापतीपदी विशाखा पेडणेकर यांची बिनविरोध निवड बुधवारी करण्यात आली.याकरिता प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यावेळी ही निवड प्रक्रिया पार पडली. नवनिर्वाचित सभापतीचे मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, नगराध्यक्ष प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, देवगड प. स. सभापती सुनील पारकर,प्रकाश घाडी, सर्व नगरसेवक-नगरसेविका, स्वीकृत नगरसेवक यांनी अभिनंदन केलं.
अशा असतील नवीन समित्या
नियोजन आणि विकास, वीज,पर्यटन,पाणीपुरवठा समिती : राजेंद्र वालकर(सभापती, पदसिद्ध) सदस्य – प्रणाली माने, उमेश कणेरकर, विकास कोयडें
सार्वजनिक बांधकाम,जल:निसारण समिती : बापू जुवाटकर (सभापती), सदस्य-उज्वला अदम, नीरज घाडी, रोहिणी तोडणकर
स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, क्रीडा समिती : संजय तारकर (सभापती), सदस्य योगेश चांदोसकर,उमेश कणेरकर, आत्माराम जाधव
महिला बालकल्याण समिती : प्राजक्ता घाडी(सभापती), विशाखा पेडणेकर(उपसभापती), सदस्य : श्रुती जाधव, प्रणाली माने, रोहिणी तोडणकर याप्रमाणे या समित्या असणार आहेत.