You are currently viewing कुडाळ तालुक्यातील देउळवाडा नेरुर गावातील घाडीवाडा येथील रस्त्याचा प्रश्न अखेर निकाली

कुडाळ तालुक्यातील देउळवाडा नेरुर गावातील घाडीवाडा येथील रस्त्याचा प्रश्न अखेर निकाली

कुडाळ :

 

घाडीवाडा येथे जवळपास चाळीस घरे असून जवळपास २००/२५० च्या आसपास लोकसंख्या आहे. सदर वाडीमध्ये जाण्यासाठी आजपर्यंत अधिकृत रस्ता नव्हता. त्यासाठी शासन दरबारी अनेक प्रयत्न केले, प्रसंगी आमरण उपोषणाचा मार्गसुद्धा अवलंबविण्यात आलेला होता,पण ग्रामस्थांना न्याय मिळत नव्हता.शेवटी ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत एकत्र येवून माजी सरपंच श्री. प्रसाद पोईपकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जमीन मालकांना भेटून चर्चा केली व समेट घडवून आणला त्यासाठी सर्व जमीन मालकांनी सहकार्य करण्याचे वचन दिले व आज सकाळी श्री देव कलेश्वर, श्री देव गावराखा चरणी श्रीफळ अर्पण करुन संपूर्ण वाडीमध्ये जाणाऱ्या रस्त्याच्या कामाची सुरवात केली.सदर कामाचा शुभारंभ देउळवाडा नेरुरचे माजी सरपंच श्री. प्रसाद मधुकर पोईपकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.याप्रसंगी सरपंच सौ.भक्ती घाडीगांवकर, श्री. हेमंत घाडी, श्री. निलेश घाडी,श्री. दिलीप घाडी, श्री. संतोष घाडी,श्री. रमेश घाडी,श्री.वासुदेव घाडी, श्री. किशोर घाडी, श्री. काशिनाथ घाडी,श्री. चंद्रकांत घाडी, श्री. पांडुरंग घाडी, श्री. शामसुंदर घाडी, श्री. सुभाष घाडी,श्री.आनंद घाडी, श्री. विनायक घाडी, श्री.सुधाकर घाडी, श्री. शशिकांत घाडी, श्री. रवींद्र घाडी, श्री. गोपाळ घाडी, श्री. अशोक घाडी, श्री. राजू घाडी, श्री. सुधीर घाडी, श्री. सुरेंद्र घाडी, श्री. दिनेश अ.घाडी, श्री. दिनेश सु.घाडी, श्री. शंकर घाडी, श्री. गुरुनाथ घाडी, श्री. अरुण घाडी तसेच घाडीवाड्यातील ईतर सर्व ग्रामस्थ,महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा रस्ता होण्यासाठी उपविभागीय अधिकारी,कुडाळ श्रीम.ऐश्वर्या काळूशे,मा.तहसीलदार,मंडल अधिकारी,वालावल,तलाठी,महावितरणचे अधिकारी, कर्मचारी,ग्रामपंचायत देउळवाडा नेरुर, श्री देव कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती,सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते,सर्व दैनिकांचे पत्रकार यांचे सहकार्य लाभले.विधी व न्याय विभाग सिंधुदुर्गचे वरिष्ठ अधिकारी परंतु आज आपल्यामध्ये हयात नसणारे कै.संतोषजी सामंत यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांची आठवण काढून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.सदरचा रस्ता झाल्यांने संपूर्ण वाडीमध्ये उत्साहाचे व एकोप्याचे वातावरण होते.आज संपूर्ण दिवसभर वाडीतील तरुणांनी जेष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान करून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा