लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलीस “अलर्ट”…
अधिक्षकांची माहिती; फिक्स पॉईंट, नाकाबंदी, पेट्रोलिंगद्वारे विशेष लक्ष…
सिंधुदुर्गनगरी
लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस सज्ज झाले आहे. यावेळी जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांसह दंगल नियंत्रक पथके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर विशेष ठिकाणी फिक्स पॉईंट, नाकाबंदी, पेट्रोलिंग द्वारे खास लक्ष ठेवण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ तारखेला लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. याबाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.