*जन्मशताब्दीचे औचित्य साधून आजगाव येथील सौदागर कुटुंबीयांचा आगळा वेगळा उपक्रम*
सावंतवाडी / आजगाव:
कै. वामन नारायण सौदागर यांच्या जन्मशताब्दी निमित्त संवादिनीची तोंड ओळख हा उपक्रम आजगावं येथे घेण्यात आला. या उपक्रमात प्राथमिक शाळेतील मुलांना संवादिनी (हार्मोनियम) विषयी मार्गदर्शन करण्यात आले. एकूण ७ मुलांनी यात सहभाग घेतला. त्यांच्यावर वैयक्तिक लक्ष देण्यात आले. या उपक्रमात मुग्धा सौदागर व विनय सौदागर यांनी मार्गदर्शन केले. तसेच मुलांना संवादिनी म्हणजेच हार्मोनियम (बाजापेटी) ची तोंडओळख व्हावी, म्हणून एक छोटीशी कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत सातसूर, कोमल – तीव्र – मध्यम स्वर, काळी – पांढरी पट्टी, आरोह – अवरोह, भूप – भीमपलास – यमन हे राग, त्यातील गाणी यांची तोंडओळख करून देण्यात आली. आपल्या वडीलांच्या जन्म शताब्दीनिमित्त दरवर्षी दर महिन्यात एक उपक्रम राबविण्यात येतो, असे विनय सौदागर व संध्या कामत यांनी सांगितले.