You are currently viewing महिला सन्मान योजना ‘लालपरी’साठी लाभदायी…

महिला सन्मान योजना ‘लालपरी’साठी लाभदायी…

महिला सन्मान योजना ‘लालपरी’साठी लाभदायी…

13 महिन्यांत 1 कोटी 80 लाखांहून अधिक महिलांनी केला प्रवास.

कणकवली

राज्य सरकारने एसटीतून महिलांना सवलतीच्या दरात प्रवास करता यावा यासाठी ‘महिला सन्मान योजना’ सुरु केली. ही योजना सुरु झाल्यापासून एसटीच्या सिंधुदुर्ग विभागातून मागील 13 महिन्यांत 1 कोटी 80 लाख 76 हजार 157 महिलांनी प्रवास केला आहे. या योजनेमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ झाली असल्याने ही योजना ‘लालपरी’साठी लाभदायी ठरत आहेत.
राज्य सरकारने एसटीमधून सर्व महिला प्रवाशांना तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली आहे. ‘महिला सन्मान योजना’ असे या योजनेला नाव दिले आहे. या सवलीतमुळे एसटीचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकार एसटी महामंडळाला दरमहिन्याला फरकाची रक्कम देत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातून महिला सन्मान योजनेला महिलांचा उदंड प्रसिसाद दिल्याने आकडेवारीवरून दिसून येत आहे. या योजनेमुळे एसटीमधील महिला प्रवशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सिंधुदुर्ग विभागातून 17 मार्च 2023 पासून सुरु झालेल्या या योजनेद्वारे मार्च महिन्यात 5,06,047, एप्रिलमध्ये 12,62,775, मेमध्ये 11,39,878, जूनमध्ये 15,77,351, जुलैमध्ये 11,53,340, ऑगस्टमध्ये 12,97,070, सप्टेंबरमध्ये 13,26,923, ऑक्टोबरमध्ये 13,01,945, नोव्हेंबरमध्ये 12,89,662, डिसेंबरमध्ये 14,64,984, जानेवारीमध्ये 13,86,921, फेब्रुवारीमध्ये 13,27,784, मार्च 14,90,583, एप्रिलमध्ये 15,50,894 असे एकूण मिळून 1 कोटी 80 लाख 76 हजार 157 महिलांना सवलतीच्या दरात ‘लालपरी’तून प्रवास केला.
महिला सन्मान योजनेचा लाभ विशेषतः ग्रामीण भागातील महिला प्रवाशांना आहे. दररोज कामानिमित्त शहराच्या ठिकाणी येणार्‍या महिलांना सहा आसनी रिक्षा, रिक्षा अथवा अन्य खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागत होता. परंतु त्यांच्याकडून जादा दर आकरले जात होते. मात्र, या योजनेनुमळे सवलतीच्या दरात प्रवास करणे महिलांना शक्य झाले आहे.

WhatsApp

प्रतिक्रिया व्यक्त करा