You are currently viewing आवडीच्या क्षेत्रानुसार मुलांना पालकांनी प्रोत्साहन द्यावे – राजन तेली

आवडीच्या क्षेत्रानुसार मुलांना पालकांनी प्रोत्साहन द्यावे – राजन तेली

आवडीच्या क्षेत्रानुसार मुलांना पालकांनी प्रोत्साहन द्यावे – राजन तेली:

सावंतवाडी

प्रत्येक पालकांची आपला मुलगा या क्षेत्रात गेला पाहिजे. त्या क्षेत्रात गेला पाहिजे, अशी इच्छा असते. परंतु मुलांना ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे. त्याना त्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे असे प्रतिपादन भाजप नेते तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे केले. दरम्यान गेल्या दहा-बारा वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा हा दहावी, बारावी निकालामध्ये प्रथम क्रमांक राज्यात मिळवत आहे. शेवटी हा जिल्हा कलेचा असून हीच मुलं जिल्हा घडवणार आहेत, असं गोरद्गार देखील यावेळी श्री तेली यांनी काढले. ते सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला, व्यक्तीचित्रण प्रात्यक्षिक, करिअर संधी मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते.

ते म्हणाले की चित्रकला मार्गदर्शन करण्यासाठी जे आज आयोजन करण्यात आले आहे. त्याचा लाभ मुलांनी घेऊन आपल्याला पुढे त्या कृतीतून काय करता येईल याचा विचार करून या शिबिराचा मुलांनी आवर्जून लाभ घ्यावा. हा जिल्हा कलेचा असून जिल्हा व देश घडवणं हे मुलांच्या हातात असून पालकांनी देखील आपल्या मुलांना ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले. दरम्यान समाजासाठी आपण काहीतरी घेणेदेणे लागतो व मुलांच्या हातात देश प्रगतीवर नेण्याचं ताकद आहे. त्यामुळे यापुढेही मुलांसाठी ज्या ठिकाणी माझी गरज लागेल त्या ठिकाणी मी त्यांच्यासाठी नक्कीच उभा राहीन असा विश्वास श्री तेली यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा