You are currently viewing कृष्णा सुद्रिक वनविभागाचा कणा आणि खंबीर पाया होते – डॉ. सुनील लाड

कृष्णा सुद्रिक वनविभागाचा कणा आणि खंबीर पाया होते – डॉ. सुनील लाड

*कृष्णा सुद्रिक वनविभागाचा कणा आणि खंबीर पाया होते – डॉ. सुनील लाड*

*वनविभागात काम करताना आपल्या कौशल्याने कामाचा एक वेगळा ठसा उमटविला*

‌कणकवली
कृष्णा सुद्रिक यांनी आपल्या अनुभवातून आणि आपल्या कौशल्याने वनविभागात काम करताना आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटविला.ते वनविभागाचा कणा आणि खंबीर पाया होते.ते सेवानिवृत्त होत असल्याची खंत जाणवत आहे.असे प्रतिपादन डॉ. सुनील लाड, सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी यांनी केले.

ते कणकवली तालुक्यातील वनपरीमंडळ दिगवळे येथील वनविभागाच्या कार्यालयात वनमजूर सुद्रीक यांच्या सेवानिवृत्ती समारंभाच्या कार्यक्रमात शुक्रवारी बोलत होते.

यावेळी श्री संदीप कुंभार प्रभारी वनक्षेत्रपाल कणकवली,श्री अमित कटके ,वनक्षेत्रपाल कडावल,कृष्णा नारायण सुद्रिक वनमजूर दिगवळे,सौ.रुक्मिनी कृष्णा सुद्रीक,व्हि.व्हि.मयेकर, नितिश भिसे शिवडाव सरपंच,श्री सर्जेराव पाटील वनपाल दिगवळे, सारीक फकीर वनपाल देवगड,शशिकांत साटम वनपाल दिगवळे,,श्री सिद्धार्थ शिंदे वनरक्षक ,प्रतिराज शिंदे वनरक्षक, अंजली सुतार वनरक्षक, सुखदेव गळवे, वनरक्षक भिरवंडे, नारायण शिर्के, वनसेवक दिगवळे,रुक्मिणी कृष्णा सुद्रिक , संजय राणे भडगाव, रुपेश गावडे, वृषाली सुद्रीक,गौरव सुद्रीक,सागर सुद्रीक, बालाजी तळेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ.सुनिल लाड म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सुद्रीक यांनी सचोटीने आणि प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे.आपल्या ३२ वर्षाच्या सेवा कालावधीमध्ये प्रामाणिक पणे जंगल फिरती आणि जंगल संरक्षणाचे काम केले.नर्सरी मध्ये आपल्या प्रदीर्घ अनुभवातून आणि कौशल्यातून रोपवन केले आहे.

यावेळी बोलताना संदीप कुंभार प्रभारी वनक्षेत्रपाल कणकवली म्हणाले की, वनक्षेत्रातील वनमजूर आमची संपत्ती आहे.सुद्रीक यांनी सचोटीने आणि प्रामाणिकपणे सेवा केली.त्यामुळे सेवानिवृत्ती नंतर आम्हाला खंत वाटते.फिल्डवर काम करणारे वनमजूर म्हणून त्यांची उणीव भासेल.

ते सेवानिवृत्त झाले तरी जेव्हा तुम्हाला त्यांच्या अनुभवाची आणि मदतीची गरज लागेल तेव्हा त्यांना बोलावून त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ वनरक्षकांनी घ्या .असे आवाहन त्यांनी वनरक्षकाना केले.

यावेळी डॉ सुनील लाड, सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी यांच्या हस्ते सेवानिवृत्त वनमजूर श्री.कृष्णा नारायण सुद्रिक यांचा सपत्नीक सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन करण्यात आला.

यावेळी कणकवली वनसेवकांमार्फत तसेच वनक्षेत्रपाल कार्यालय कणकवली आणि वनपन कार्यालय दिगवळे यांच्या वतीने ही शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना कृष्णा सुद्रीक म्हणाले वनविभागात काम करताना आपल्याला अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपलेपणाची वागणूक दिली.प्रेम, सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाले.ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले.म्हणूनच चांगले काम आणि सेवा करण्याची संधी मिळाली.वनविभाग हे माझे कुटुंब आहे.माझ्या मदतीची आवश्यकता लागेल तेव्हा बोलवा.आपण उपलब्ध राहु.अशी ग्वाही सुद्रीक यांनी दिली.

यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतात सुद्रीक यांच्या कामाचे कौतुक केले.यावेळी कणकवली मधील सर्व वनपाल, वनरक्षक, वनमजूर दिगवळे आणि नारुर मधील ग्रामस्थ उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

*अधिकारी घडवणारी कोकणातील एकमेव अकॅडमी – महेंद्रा अकॅडमी*

*🔰⚜️आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस🔰⚜️👇🏻*

*1. 🔰राज्यसेवा , संयुक्त परीक्षा गट – ब ( PSI /STI/ASO) CDPO( महिला व बालविकास अधिकारी) विशेष बॅच -2024*

*2.🔰पोलीस भरती स्पेशल बॅच – 2024*

*3.🔰 सरळ सेवा भरती स्पेशल बॅच -2024*

🎉🎊🎊 *( नवीन बॅचेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे)🎉🎊🎊*

*🔰आमच्या अकॅडमीची वैशिष्ट्ये🔰*-:
📌अनुभवी शिक्षकवर्ग.
📌सुसज्ज वाचनालय.📚📚
📌अभ्यासाला पुरक आणि शांत वातावरण.
🏠निट व स्वच्छ वर्ग.
📌पिण्याचा पाण्याची सोय.
📌वाचनालयामध्ये प्रवेश घेण्याअगोदर वाचनालय बघायची संधी.
📌आकर्षक व उपयोगी पुस्तके वाचनालयामध्ये उपलब्ध.
📌अनोखी शिकवण्याची पद्धत.
📌आमच्या अकॅडमीला एकदा भेट द्या आणि आपल्याला पडलेल्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा. *मित्रहो” महेंद्रा अकॅडमी ही आपल्या जिल्ह्यातील तरुणांमध्ये असलेली उदात्त बुद्धिमत्ता तसेच आपल्या जिल्ह्यातील मुलांमध्ये अभ्यास करण्याची असलेली क्षमता ही संपूर्ण जगाला दाखवून देण्यासाठी चालू केलेली विशेष चळवळ आहे.आपल्या बहुमूल्य वेळेपैकी थोडा वेळ आमच्यासाठी काढा आणि आमच्या अकॅडमीला एकदा नक्की भेट द्या.*
*अधिक माहितीसाठी संपर्क करा **-
🪀7350219093
📞📞9022686944

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/135355/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा