You are currently viewing गावठी बॉम्ब पेरल्याप्रकरणी तिघांना न्यायालयीन कोठडी…

गावठी बॉम्ब पेरल्याप्रकरणी तिघांना न्यायालयीन कोठडी…

गावठी बॉम्ब पेरल्याप्रकरणी तिघांना न्यायालयीन कोठडी…

सावंतवाडी

शासकीय वनात गावठी बॉम्ब पेरल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.त्यांच्या जामीनावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
अबीर प्रकाश आंगचेकर (वय ३०, रा. सांगेली-खालचीवाडी), चंद्रकांत शंकर दळवी (वय ५०, रा.आंबेगाव-म्हारकटेवाडी), शांताराम गोपाळ राऊळ (वय ४६, रा. सांगेली-टेंबकरवाडी ) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना शुक्रवारी रात्री आंबेगाव येथील जंगलात गावठी बॉम्ब पेरताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले होते. ही कारवाई सावंतवाडी वनविभागाकडून करण्यात आली होती. आज त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते

प्रतिक्रिया व्यक्त करा