You are currently viewing शासनाच्या कल्याणकारी निधी योजनेतून माजी सैनिकास घरबांधणीसाठी आर्थिक मदत

शासनाच्या कल्याणकारी निधी योजनेतून माजी सैनिकास घरबांधणीसाठी आर्थिक मदत

शासनाच्या कल्याणकारी निधी योजनेतून माजी सैनिकास घरबांधणीसाठी आर्थिक मदत

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत शासनाकडून वेळोवेळी निर्धारीत केलेल्या विविध योजनांतून जिल्ह्यातील पात्र शहीदांच्या वीरपत्नी, विरमाता, वीरपिता, माजी सैनिक, माजी सैनिक विधवापत्नी, अपंग माजी सैनिक, त्यांची अनाथ पाल्ये, अवलंबित यांच्याकरीता कल्याणकारी निधीतून शैक्षणिक व पुनर्वसनाच्या विविध प्रकारच्या आर्थिक मदती दिल्या जातात.

त्या अनुषंगाने माजी सैनिक शेफुद्दिन अजीज नाईक, रा. माणगांव, ता. कुडाळ यांना  सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्यावतीने घरबांधणीकरिता दिली जाणारी आर्थिक मदत रक्कम रू. 50,000/- चा धनादेश  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या हस्ते अदा करण्यात आला. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कर्मचारी सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर व अनिल नाटलेकर हे उपस्थित होते.

तरी  जिल्ह्यातील पात्र शहीदांच्या वीरपत्नी/विरमाता/ वीरपिता/ माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी, अपंग माजी सैनिक, त्यांची अनाथ पाल्ये/ अवलं‍बित यांनी अश्या प्रकारच्या कल्याणकारी योजनांचा (उदा.शैक्षणिक/ स्वयंरोजगार/ पुनर्वसन) लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 02362-228820 वर संपर्क  करावा असे आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा