You are currently viewing पर्यावरणप्रेमी समूहाकडून वृक्षारोपण आणि दत्तक उपक्रमाचे आयोजन

पर्यावरणप्रेमी समूहाकडून वृक्षारोपण आणि दत्तक उपक्रमाचे आयोजन

*पर्यावरणप्रेमी समूहाकडून वृक्षारोपण आणि दत्तक उपक्रमाचे आयोजन*

पिंपरी

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केवळ एक दिवसाचा उपक्रम साजरा न करता पर्यावरणाची शाश्वतता आणि सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी अशोकानगर, ताथवडे येथील पर्यावरणप्रेमी समूह सातत्याने दर शनिवार आणि रविवारी वृक्षारोपण आणि वृक्ष दत्तक उपक्रमाचे आयोजन करीत आहे. विशेषत: तरुणांचा सहभाग असलेल्या या समूहाने आतापर्यंत परिसरात १०० वृक्षांचे रोपण केले असून ही मोहीम संपूर्ण पिंपरी – चिंचवड शहरात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती वेणुप्रसाद सरोदे यांनी दिली. तेजस चवरे, शशिकांत सुतार, नीलेश घोरपडे, आनंद डोळस, गणेश कुंदाने, सागर हंबीर, समीर पाटील, गणेश कुलकर्णी, गणेश गोसावी, अमोल बागूल, विक्रम पिल्लई, सुधीर रहासे, एन. पी. देवकर या समूह सदस्यांच्या सहभागातून तसेच स्थानिक रहिवासी, विद्यार्थी आणि स्वयंसेवी कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

वृक्षारोपण करताना आवर्जून स्थानिक रहिवाशांना सहभागी केले जाते. हवा शुद्धीकरण, मृदा संवर्धन, जैववैविध्याचे जतन यामध्ये असलेल्या वृक्षारोपणाच्या महत्त्वाविषयी समुपदेशन करून इच्छुक व्यक्तीस प्रत्येकी एक झाड दत्तक दिले जाते. तसेच समूहाकडून दत्तक झाडांची देखभाल आणि निरीक्षण केले जाते. पर्यावरण संवर्धनाविषयी सामुदायिक जागरुकता निर्माण व्हावी हेच पर्यावरणप्रेमी समूहाचे उद्दिष्ट आहे, असेही वेणुप्रसाद सरोदे यांनी नमूद केले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा