*आचारसंहितेचा बाऊ नका करू…*
*अत्यावश्यक आरोग्य सेवा द्या, अन्यथा आंदोलन – इर्शाद शेख
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांचेकडे असणाऱ्या ऑर्थोपेडिक मशिनरी बंद पडल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कणकवली उपजिल्हा रुग्णालयाकडे ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेसाठी पाठविण्याची नामुष्की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर ओढावली आहे.
या जिल्ह्यात चार चार मंत्री असून सुद्धा त्यांचे आरोग्य व्यवस्थेवर झालेले अक्षम दुर्लक्ष याचाच परीणाम आरोग्य व्यवस्था पुर्णत: कोलमडली आहे. आरोग्य सेवा हि अत्यावश्यक सेवा असल्याने त्याकडे तात्काळ या सर्वांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये आर्थोपेडिक रुग्णांच्या संदर्भातील शस्त्रक्रिया तज्ञ ऑर्थोपेडिक डॉक्टर श्री. ठाकूर व डॉक्टर श्री. चव्हाण यांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरा पूर्वीपासून पार पडत होत्या. मात्र सुमारे दीड वर्षाच्या कालावधीपासून ऑर्थोपेडिक रुग्णांसाठी असलेल्या चार सी- आर्म मशिनरी होत्या. त्यापैकी दोन बंद पडलेल्या व भंगार झालेल्या आहेत. तर उर्वरित दोन चालू ऑर्थोपेडिक सी आर्म मशीन गेल्या दोन महिन्यापासून बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे शासकीय मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या आर्थोपेडीक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अन्य ठिकाणी म्हणजे गोवा बांबुळी व कणकवली या ठिकाणी पाठविण्यात येत आहेत.
या अत्यावश्यक अश्या सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज कडील शस्त्रक्रियेच्या मशिनरी दुरुस्ती वा नवीन आणण्यासाठी शासन स्तरावर कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. त्याचप्रमाणे प्रशासनानेही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. यामुळेच जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज व जिल्हा सामान्य रुग्णालय यातील मशिनरी बंद पडत चालल्याने ऑर्थोपेडिक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अन्य ठिकाणी पाठविण्यात येत आहे. अलीकडच्या कांही दिवसात सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजकडे ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेसाठी आलेल्या रुग्णांना शासनाच्या कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्याची नामुष्की सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजवर आली आहे.
त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजूर केलेली कार्डियाक कॅथलॅब साठी निर्माण झालेला जागेचा प्रश्न शासकीय मेडिकल कॉलेजच्या नजिकच्या भागातील जमीन संपादित करून घेऊन ती लॅब होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र ते घडले नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातच त्याची सेवा जिल्ह्यातील रुग्णांना मिळू शकली असती. विकासाच्या वल्गना करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना याचे कोणतेही सोयरसुतक नाही.
आर्थोपेडीक आरोग्य सेवेची अत्यावश्यक सेवा आता तरी ती आर्थोपेडीक सर्व मशिनरी दुरुस्त करून त्याची सेवा तात्काळ सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत. अत्यावश्यक आरोग्य सेवेच्या कामास आचार संहितेचा प्रश्नाचा बाऊ न करू नये. अन्यथा तमाम सर्वसामान्य जनतेच्या या महत्त्व पुर्ण सेवेसाठी नाईलाजाने काँग्रेसच्या माध्यमातून व जनतेच्या सहभागात तीव्र आंदोलन छेडले जाईल. याची नोंद घ्यावी. असा इशारा देण्यात आला आहे.