*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी शशांक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*इवल्या कुटीत माझ्या…*
सुख ते हवे जिवाला, नाही महाल कुठला…
खुश मी कुटीत माझ्या, नाही मलाल कुठला…
इवल्या कुटीत माझ्या, नाही कमी कशाची…
देतेय भरभरूनी, नाही सवाल कुठला…
ग्रामस्थ मी असा मज मातीच माउली ती…
निःस्वार्थ पोसते जी, नाही दलाल कुठला…
देऊन बोल जाते, ओठात मायमाती…
गातो तिचीच महिमा, नाही कवाल कुठला…
इवलीच झोपडी पण देऊन मोद जाते…
करते बहाल उर्जा, नाही बवाल कुठला…
वात्सल्य प्रेम माया, वाहे कुटीत माझ्या…
चादर जशी सुखाची, नाही रूमाल कुठला…
✍️शशांक दिनकरराव देशमुख©®
नांगलिया नगर, चांदुरबाजार
ता. चांदुरबाजार, जि. अमरावती
(महाराष्ट्र राज्य) – ४४४ ७०४
मो./व्हा. क्र. ९९२३५३६३२५