You are currently viewing भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनी घेतली नायब तहसीलदार यांची भेट.

भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनी घेतली नायब तहसीलदार यांची भेट.

*भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनी घेतली नायब तहसीलदार यांची भेट.*

*ऑनलाईन सातबारा,आपत्कालीन आढावा,शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तातडीने मिळणेबाबत सादर केले निवेदन*

सावंतवाडी

भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ श्वेता कोरगावकर यांनी आज सावंतवाडी नायब तहसीलदार श्री.चव्हाण यांची भेट घेत सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी व्यापारी व सर्वसामान्य नागरिक यांच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली, सुचना दिल्या व निवेदन सादर केले.
2021 साली तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या व्यापारी व शेतकऱ्यांच्या अतिरिक्त नुकसान भरपाईचे अद्याप वाटप झाले नसल्याचे कोरगावकर यांनी नायब तहसीलदार यांच्या लक्षात आणून दिले.सदर नुकसान भरपाई मिळण्यास एवढा उशीर का लागला असा जाबही विचारला. सदर नुकसान भरपाई तातडीने लाभार्थ्यांना देण्याची सुचना देखील करण्यात आली.अन्यथा या प्रश्नावर आंदोलन करण्याची वेळ येईल असेही सूचित केले.त्याचप्रमाणे तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांचे सातबारा प्रशासनाच्या चालढकलपणामुळे अजूनही ऑनलाइन झालेले नाहीत.हेदेखील मा. नायब तहसीलदार यांना सांगण्यात आले. शेतकऱ्यांकडून सर्व कागदपत्रे जमा करून देखील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ऑनलाईन सातबारा तयार होत नाहीत व त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून सर्वांचे सातबारे त्वरित ऑनलाईन करण्यात यावेत असे देखील निवेदनाद्वारे सांगितले.
यावेळी सौ.कोरगावकर यांनी येणाऱ्या पावसाळ्याच्या अनुषंगाने तालुक्यातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना देखील केल्या. तसेच NDRF व इतर खात्यांशी याबाबत नियोजन करण्याचे सांगितले व तालुक्यातील शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसू नये यासाठी यंत्रणा राबवण्यात यावी असे देखील सुचित करण्यात आले.

यावेळी भाजपा महिला जिल्हा मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ श्वेता कोरगावकर यांच्यासोबत माजी सभापती शितल राऊळ, भाजपा बांदा मंडळ अध्यक्ष महेश धुरी,बांदा सरपंच प्रियांका नाईक,सिद्धेश पावसकर,मधुकर देसाई,बांदा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, केसरकर,रत्नाकर आगलावे, तनुजा वराडकर,अवंतिका पंडित, गुरु कल्याणकर,गुरु सावंत,सिद्धेश महाजन,व्यंकटेश ऊरुमकर आदी हजर होते.

======================
केंद्र व राज्य सरकारकडून सर्वसामान्यांचा विचार करून योजना राबवल्या जातात. परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अशा योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही. हा विषय केवळ सावंतवाडी तालुक्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधव,मच्छिमार,व्यापारी,व्यावसायिक हे या ऑनलाईन सातबारा न झाल्यामुळे त्रस्त व अडचणीत आहेत.याबाबतच्या असंख्य तक्रारी माझ्यापर्यंत आलेल्या आहेत. हा प्रश्न मी मा.जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यापर्यंत नेऊन हा विषय मी तडीस नेणार आहे. – भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरेगावकर
=====================

सदर ऑनलाईन सातबारा प्रकरणी शासनाने अशा पिडीत शेतकऱ्यांशी संपर्क साधत प्रत्येक गावात कॅम्प लावले जावेत व हा प्रश्न सोडवला जावा – माजी पंचायत समिती सभापती शितल राऊळ

=====================

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भातील ऑनलाईन KYC संदर्भात शेतकऱ्यांना माहिती होण्याकरिता शासनाने एखादा डीजीटल संदेश अथवा संपर्क कार्यक्रम राबवावा. जेणेकरून शेतकऱ्यांना त्याची माहिती मिळेल – गुरु कल्याणकर

=====================

प्रतिक्रिया व्यक्त करा