You are currently viewing सावंतवाडी वनविभागाच्या वतीने वन्यप्राणी माकड/वानर यांच्या मुळे होणार उपद्रव टाळण्यासाठी विविध उपाययोजना

सावंतवाडी वनविभागाच्या वतीने वन्यप्राणी माकड/वानर यांच्या मुळे होणार उपद्रव टाळण्यासाठी विविध उपाययोजना

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी वन्यप्राणी माकड/वानर यांच्या उपद्रव मुळे शेतपिक आणि फळबाग चे नुकसान होण्याच्या तक्रारीमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यावरील उपाययोजना म्हणून सावंतवाडी वन विभागाच्या वतीने जलद बचाव पथक (Rapid Response team) ची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाच्या मार्फत मनुष्यवस्ती नाजिक वन्यप्राणी माकड वानर यांच्या उपद्रव असणाऱ्या क्षेत्रात पिंजरे लावून वन्यप्राणी माकड वानर यांना पकडून त्यांना सुखरूप नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येत आहे. आज अखेर या पथकाचे मदतीने वायंगणी- दाभेली, मोरे, देवसू , चाफेली, आंबेरी या ठिकाणी 20 माकड/वानर यांना पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे. तसेच अश्या प्रकारे मनुष्यवस्तीत वन्यप्राणी माकड वानर यांचा उपद्रव असणाऱ्या भागातील नागरिकांना वन विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येते की या बाबतची माहिती स्थानिक वनविभागाच्या कार्यालयात किंवा वनविभागाचे अधिकारी कर्मचारी यांना देण्यात यावी.

तसेच वन्यप्राणी माकड /वानर यांच्या नुकसानी बाबत दीर्घकालीन उपाययोजना करणे करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकड/ वानर यांची शास्त्रीय पद्धतीने प्रगणना सावंतवाडी वनविभागा मार्फत SACON कोइंबतूर या संस्थेच्या मदतीने करण्यात आली असून त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दीर्घकालीन उपाययोजना करणेचे दृष्टीने कार्यवाही सावंतवाडी वनविभाग मार्फत करणेत येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा