You are currently viewing आयुष्य म्हणजे काय असतंॽ

आयुष्य म्हणजे काय असतंॽ

*ज्येष्ठ साहित्यिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आयुष्य म्हणजे काय असतंॽ*

 

आयुष्य म्हणजे काय असतं ॽ

न पेलता येणार ओझं असतं,

न मागता जन्म मिळतो,पण कां

तेच काही कळलं तरी वळतनसतं

 

नको असलेला भारघेऊनजगायचं

ओझ्याखाली उगाचंचदबूनजायचं

आपण कुणाला हवे की ,नको ते

कळतनसतं,तरीपणआपणजगतो

 

अर्थशुन्य‌ जगण्याचा अर्थ लावत

जगण्यासाठी नवीन पर्यायशोधतो

आयुष्यसंपतजाते,तरीअर्थ लावत

बसतो,न मिळणारी उत्तरे शोधतो

 

सत्कर्माची आस लावून घडवितो

मनावरचे ओझे वाढते मी राहतो,

भारवाहू गर्दभासम दिग्मूढनिशब्द

मनुजन्मी कृतार्थतेचा भार वाहतो

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 

स्वप्न गंधा सतीश ‌आंबेतकर

मुंबई. विरार

प्रतिक्रिया व्यक्त करा