You are currently viewing तुझ्यासाठी

तुझ्यासाठी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी रामदास (अण्णा) पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*तुझ्यासाठी*

 

तुला बोलल्या विना, दिवस जात नाही

तुझ्या प्रेमा पुढे, काही आठवत नाही

 

रोज रोज तुझ्यासाठी, जीव माझा झुरतो

कसं सांगू तुझ्यावर, किती प्रेम करतो

 

दूर आहे तरी मला, दूर वाटत नाही

म्हणूनच तुला मी,रोज रोज भेटत नाही

 

किती जरी चूकले तू, साथ सोडत नाही

तु खंबीर आहे म्हणुन, मी रडत नाही

 

झाल्या गेल्या चुका माझ्या, मला आहे मान्य

तुझ्यविना राणी माझी, किंमत आहे शून्य

 

डोक्यावर हात ठेवून, वचन दिले आहे

मीच आता माझ्याशी, हे प्रण केले आहे

 

तुला सोडुन पुढे मी, काही करणार नाही

आहे मला विश्र्वास तू, रुसवा धरणार नाही

 

सोबत तुझी साथ हवी, गळ्यात हवी मिठी

येथून माझा श्वास आहे, फक्त तुझ्यासाठी

 

@रामदास आण्णा

प्रतिक्रिया व्यक्त करा