दिव्यांग मुलांच्या नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…
निरामय व गुरुजी फाउंडेशनचे आयोजन; डाॅ. नेहा सावंतांकडून तपासणी
सावंतवाडी
येथील नेत्र तज्ञ डॉक्टर स्नेहा सावंत यांच्या माध्यमातून दिव्यांग मुलांसाठी घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना औषध व चष्मा वाटप करण्यात आले.
निरामय विकास केंद्र कोलगाव आणि गुरुजी फाउंडेशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यापीठ या तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मुलांची डोळ्याची तपासणी केली व औषधे पुरवठा देण्यात आला. दरम्यान संस्थेच्या माध्यमातून संबंधित मुलांना चष्मा वाटप करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. सावंत यांच्या माध्यमातून मुलांनी डोळ्याची निगा कशी राखावी, कशी काळजी घ्यावी, तपासणीनंतर करण्याचा उपाय याबाबत माहिती देण्यात आली.