*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गाभारा*
करी कोणी चोरी मारी
कोणी मागते भीक
सुपीक भूमीत
साबराचे पीक
कोणी ओरबाडी वेली
कोणी झाडांना कापतो
गंध सारा तुडवून
कोणी सावल्या जाळतो
असे घडतेच कसे
कोणी का न घेई शोध !
कोणी संताने येऊनी
द्यावा माणसाला बोध
एक भला ज्ञानमार्ग
जो जाळीतो अंधारा
त्याने सरते पशूता
भरे मनाचा गाभारा
कवयित्री
अनुपमा जाधव