You are currently viewing पुण्यात आणखी एक अपघात…

पुण्यात आणखी एक अपघात…

पुण्यात आणखी एक अपघात… भरधाव ट्रकच्या धडकेत दोन तरुण ठार

पुणे

पुण्यात ‘हिट अॅण्ड रन’ घटना ताजी असतानाच आता एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका भरधाव ट्रकने फरफटत नेल्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील खराडी जकातनाका येथे सोमवारी रात्री घडली.

अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला आहे. दुचाकीवरील दोघे ट्रकखाली सापडल्यानंतरही चालकाने ट्रक तसाच पुढे नेत त्यांना फरफटत नेले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.

शामबाबू रामफल गौतम (वय 35, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर आदिल मजहर शेख (वय 20, रा . अहमदपूर, लातूर), फहाद गोहर गुलाम असकर शेख (वय 20, रा. औसा, लातूर) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. या अपघाताबाबत अफान शौकत शेख (वय 20, रा. उदगीर, लातूर) याने फिर्याद दिली आहे. सोमवारी रात्री सवादहाच्या सुमारास नगर रस्त्यावरील खराडी येथील वाघेश्वर पार्ंकगसमोर ही घटना घडली. घटनेत फिर्यादी अफान जखमी झाला आहे.

सोमवारी रात्री फिर्यादी अफान आणि त्याचे मित्र आदिल, फहाद हे तिघे एका दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने येत होते. जकात नाका सिग्नलवर ते थांबले असता पाठीमागून येणाऱ्या मालवाहतूक ट्रकने त्यांना धडक दिली. त्या वेळी दुचाकीवरील तिघे खाली पडले. यातील आदिल आणि फहाद हे ट्रकखाली सापडले. या वेळी फिर्यादी आणि इतरांनी आरडाओरड

करूनही ट्रक चालकाने ट्रक पुढे घेतला. यामुळे फरफटत गेल्याने आदिल आणि फहाद यांचा मृत्यू झाला. तर अफान जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्यासह पथकाने घटना स्थळी धाव घेतली.

– फहाद आणि आदिल लातूर जिह्यातील आहेत. ते वाघोलीतील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत होते. येथेच भाडेतत्त्वावर खोली घेऊन ते राहत होते.

*संवाद मीडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*
https://sanwadmedia.com/137185/

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच 3 जून पासून सुरू करत आहोत

( *आपले कॉलेज मधील admission निश्चित होई पर्यंत आपण फ्री lecture attend करु शकता. याची फी घेतली जाणार नाही* )
========================
*MHT -CET / JEE guidence*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/137185/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा