You are currently viewing व्यंकटेश व सुमती शानबाग स्मृती करंडक स्पर्धेत ३५३ बुद्धिबळ स्पर्धकांचा सहभाग

व्यंकटेश व सुमती शानबाग स्मृती करंडक स्पर्धेत ३५३ बुद्धिबळ स्पर्धकांचा सहभाग

गोवा:

 

व्यंकटेश व सुमती शानबाग स्मृती करंडक तिसऱ्या अखिल भारतीय फिडे मानांकन खुल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन २५ व २६ मेला मांगोर हिल वास्को येथील सेंट तेरेझा हायस्कूलमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेत ३५३ बुद्धिबळपटूनी सहभाग घेतला होता. त्यात आय एम खेळाडूंचाही समावेश होता. ही स्पर्धा मुरगाव तालुका बुद्धिबळ संघटनेने तसेच गोवा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्यांने आयोजित केली होती.

यावेळी स्पर्धा पुरस्कर्ते सुकांत शानभाग, मुरगाव तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष किशोर बांदेकर, सचिव मुकुंद कांबळी, खजिनदार पुंडलिक नायक, स्पर्धेचे मुख्य आर्बिटर संजय कवलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.

गोव्याच्या इंटरनॅशनल मास्टर (आयएम) अमेय अवदी याने व्यंकटेश व सुमती शानबाग स्मृती करंडक तिसऱ्या अखिल भारतीय फिडे मानांकन खुल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम विजेतेपद पटकावून सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा जिंकली आहे. तसेच गोव्याचा आयएम एथन वाझ याला उपविजेतेपद, महाराष्ट्राचा आयएम समीर काठमाळे याने तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. तर मंदार लाड, आयएम ऋत्विज परब, स्नेहल भोसले सुदर्शन भट, रूबेन कुलासो, दत्ता कांबळी, सरस पोवार, दिमित्री बेझस्त्राखोव, अस्मिता रे, एड्रिक वाझ, ऋषिकेश परब, अथर्व शिरोडकर, जोशुआ तेलीस, बाळकृष्ण पेडणेकर, सौरीश काशेलकर, पार्थ साळवी, यश पोल यांना अनुक्रमे चौथा ते विसावा क्रमांक प्राप्त झाला आहे. या स्पर्धेत गोवा तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, नाशिक, राजापूर, रत्नागिरी, कणकवली, आणि सिंधुदुर्ग या सर्व भागातून खेळाडू सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा