You are currently viewing सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभाग आयोजित हनुमंत गड संवर्धन मोहीम

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभाग आयोजित हनुमंत गड संवर्धन मोहीम

हनुमंत गडावर २६/२७ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या गड संवर्धन गडावर चढण्याआधी फुकेरी गावची ग्रामदेवता श्री वैज माऊली देवीला श्रीफळ ठेऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच तेथील मानक-यानी गा-हाण देऊन, आम्ही निघालो ते थेट गडावरील दिंडी दरवाजा जवळील तटबंदिच्या बाजुला वाढलेली झाडी तोडून‌ तटबंदि मोकळी केली, तसेच दिशा दर्शक लावण्यात आले, मुख्य दरवाजा वरील गवत काढण्यात आले, हि मोहिम दोन दिवस एक रात्र अशी होती, त्यात काम वाटून दिली होती, तसेच सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग चे दुर्गसेवक आणि दुर्गसेविका पण होत्या, त्याच बरोबर इतरही प्रतिष्ठान चे दुर्गसेवक आले होते, फुकेरी गावातील शिवप्रेमी आले होते, या‌ सर्वांसोबत काम करताना एक वेगळीच मजा आली, *सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागासाठी ज्यांनी औजारे दिली*.
1) सौ. अश्विनी ताई रोहन पुळसकर (सावंत) यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांच्या कडून २) टिकावं १)फावडे 2)श्री. तुषार रेडकर यांच्याकडून १) फावडे
3) श्री. अर्जुन अजिंक्य अहिरे यांच्याकडून २ पारई
4) श्री. प्रमोद मगर यांच्याकडून पत्नी प्राचीताई प्रमोद मगर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त 1मेजर टेप 5) नितीश ऋषिनाथ पत्याणे यांच्याकडून 1 कप्पी 1 चिन्नी 1 हातोडा 1छोटी कुऱ्हाडे 6) श्री. रणजित देसाई यांच्याकडून वडिलांच्या स्मरणार्थ राझू ( दोरी ) बंडल . 7) श्री. अमित कदम यांच्याकडून 1 चैन ब्लॉक,
8) ह्युमन राईट्स चे सह सचिव अमित वेंगुर्लेकर यांच्या कडून जनरेटर भांड,
9) रामचंद्र आईर यांच्या कडून जेवणाच सामान देण्यात आलं,
या सर्वांचं सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागातील सर्व दुर्ग सेवक व रणरागिणी ताई यांच्याकडून शतशः आभार !या सर्वाना उदंड आयुष्य, सुख, संपत्ती, समृद्धी, उत्तम आरोग्य लाभो. हीच मनापासून शुभेच्छा !

प्रतिक्रिया व्यक्त करा