सावंतवाडी :
बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल डॉ. व्ही के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावीचा एकूण निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेतून चैतन्य सुहास बांदेकर व राज जीवबा वीर ९७.६० टक्के मिळवून दोघांचा विभागून प्रथम, सुयश सुनील राठोड ९७.२० टक्के दृतीय व चिन्मय शांताराम असणकर ९५.८० टक्के गुण मिळवीत तृतीय क्रमांक पटकवीला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण ९४ प्रविष्ठ झाले होते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले . प्रशालेच्या निकाल १०० टक्के इतका लागला आहे. संस्थेचे पदाधिकारी, पालक, व प्राचार्य यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.