सावंतवाडी :
राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडीचा इयत्ता दहावीचा निकाल १०० % लागला असून तालुक्यामध्ये उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखलेली आहे. राणी पार्वतीदेवी हायस्कूलमधून विशेष नैपुण्य ६७ विद्यार्थी, प्रथम श्रेणी ४१ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी १६ विद्यार्थी व उत्तीर्ण श्रेणी २ विद्यार्थी असे एकूण १२६ विद्यार्थीपैकी १२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रशालेतून कु.सिद्धी बबन राऊळ हि ९१.८० % (४५९ गुण) मिळवून प्रथम, कु. कुणाल प्रशांत हरमलकर ९१.६० % (४५८ गुण) मिळवून द्वितीय तर कु. पवित्रा हेमंत मसुरकर व कु. वेदा विश्वेश्वर कोळंबेकर ९१.४० % यांनी (४५७ गुण) मिळवून संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकाविला.
याचबरोबर कु. परब आदित्य प्रविण ९१.२० %, कु. कार्लेकर पार्थ राजशेखर ९१ %, कु. धोंड आर्यन जगदिश ९०.६० %, कु. लोधी अनुष्का जगरामप्रसाद ९०.६० %, कु. सारंग समृद्धी महेंद्र ९०.६० %, कु. परब बाळकृष्ण महेश ९०.२० % असे घवघवीत यश मिळवले आहे. या कामगिरीबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, सर्व मार्गदर्शक शिक्षकवृंद, पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष श्री विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष श्री. अमोल सावंत व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक श्री. जे. व्ही. धोंड, उपमुख्याध्यापक श्री. पी. एम. सावंत, पर्यवेक्षक श्रीम. बी.आर.चौकेकर व उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी हार्दिक अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.