You are currently viewing न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची उज्वल यशाची परंपरा कायम.

न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची उज्वल यशाची परंपरा कायम.

न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची उज्वल यशाची परंपरा कायम.

एस. एस. सी. चा निकाल १०० टक्के, ९५ पैकी ९५ विद्यार्थी उत्तीर्ण

अजित नाडकर्णी करणार ‌ प्रथम आलेल्या तीन विद्यार्थिनींचा यथोचित सत्कार

फोंडाघाट:

मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या परीक्षेत प्रशालेच्या प्रविष्ठ झालेल्या ९५ विद्यार्थ्यांपैकी ९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला असून यामध्ये विशेष श्रेणीत ७६ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १७ विद्यार्थी, व्दितिय श्रेणी ०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रशालेने यावर्षी सुध्दा उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. ९० टक्केच्या वर १९ विद्यार्थी आहेत. आमच्या प्रशालेचा निकाल पुढील प्रमाणे आहे.

प्रथम तीन विद्यार्थ्यांची नावे

१. कु. राठोड गायत्री विजयकुमार (प्रथम क्रमांक)
४९६/५०० – ९९.२० टक्के

२. कु. नानचे मानसी राजन (व्दितीय क्रमांक)
४९३ / ५०० – ९८.६० टक्के

३. कु. चिके चिन्मयी राजन (तृतीय क्रमांक)
४९१/५०० – ९८.२०

यशस्वी विद्यार्थ्याचे फोंडाघाट एज्यू. सोसायटीचे चेअरमन मा. श्री. सु. मा. सावंत, सेक्रेटरी मा. श्री.चं. शा. लिंग्रस, खजिनदार मा. श्री. आ.मा. मर्ये व शाळा समिती चेअरमन मा. श्री. द. दि. पवार,
तसेच मा. संचालक मंडळ, पालक व ग्रामस्थ तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. विजय रासम, पर्यवेक्षक मा. श्री.
प्रसाद पारकर व सर्व शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

या यशाबद्दल पंचक्रोशीतील सर्व स्तरातून विद्यार्थी, शिक्षक व संस्थाचालक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

फोंडाघाट न्यु इंग्लिश स्कुलचा १००% निकाल लागला. प्रथम आलेल्या ३ ही मुलींनी बाजी मारली आहे. अजित नाडकर्णी यांनी सर्वांचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्व मुलींचा अजित नाडकर्णी यथोचीत सत्कार करणार आहेत. आपल्या शाळेचा लागलेला १००% निकाल याबद्दल सर्व स्टाफचेही केले अभिनंदन असाच चढता क्रम ठेवा म्हणुन अजित नाडकर्णी यांनी दिल्या शुभेच्छा.

प्रतिक्रिया व्यक्त करा