You are currently viewing केरवाडी भगतवाडी येथे घरात आढळला पुरुषाचा मृतदेह

केरवाडी भगतवाडी येथे घरात आढळला पुरुषाचा मृतदेह

केरवाडी भगतवाडी येथे घरात आढळला पुरुषाचा मृतदेह

वेंगुर्ले

वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा केरवाडी भगतवाडी येथील दया भगत वय ३८ यांचा मृतदेह आज सोमवारी सकाळी राहत्या घरात आढळून आला. शिरोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढून रेडी येथे शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

भगतवाडी येथे दया भगत आपल्या वडिलांसोबत राहत होता. त्याची पत्नी कामानिमित्त मुंबईला होती. आज सकाळी बाजूच्या ग्रामस्थांनी त्याच्या घरात त्याला हाक दिली असता घरातून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या बाबत पोलिसांना कळवले. नंतर घरात आत प्रवेश करून पाहिले असता दया मृतावस्तेत आढळून आले. पोलीस भिसे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा