जिल्ह्यात आजपासून पॉलिटेक्निक प्रवेश केंद्रे*
सावंतवाडी
दहावीचा निकाल सोमवारी जाहीर होत असून विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण प्रवेश घेणे सोपे व्हावे, यासाठी राज्याच्या तंत्रशिक्षण विभागातर्फे पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येत आहे. विभागाच्या परिपत्रकानुसार यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सावंतवाडी येथे शासकीय प्रवेश सुविधा केंद्र क्र. ३४७० उपलब्ध आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही प्रवेश प्रक्रिया सोपी व्हावी व आवश्यक कागदपत्रे व दाखले मिळवण्यासाठी मार्गदर्शन मिळावे, यासाठी कॉलेजतर्फे कुडाळ, माणगाव, वेंगुर्ले, मळेवाड, दोडामार्ग व कणकवली या ठिकाणी प्रवेश सहाय्य केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. रमण बाणे व उपप्राचार्य गजानन भोसले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संस्थेच्या (९४०५०९९९६८) येथे संपर्क साधावा.