You are currently viewing अल्पवयीन असूनही नातवाला बर्थ डे गिफ्ट म्हणून पोर्शे कार…

अल्पवयीन असूनही नातवाला बर्थ डे गिफ्ट म्हणून पोर्शे कार…

अल्पवयीन असूनही नातवाला बर्थ डे गिफ्ट म्हणून पोर्शे कार…

 व्हॉट्सॲप चॅट मधून आणखी एक खुलासा….

पुणे

गेल्या रविवारी पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका अल्पवयीन मुलाने नशेत असताना आलिशान पोर्शे कारने दोघांना उडवले होते. यामध्ये एक तरुणी आणि तरुणाचा मृत्यू झाला होता. दरम्यान याप्रकरणातील आरोपी मुलाची रवणगी सध्या बालसुधार गृहात करण्यात आली आहे.

तर त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे.

या घटनेप्रकरणी रोज नवेनवे खुलासे होत आहेत. आता यासंबंधी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलाने अपघात केलेली पोर्शे कार त्याला वाढदिवसाला भेट दिली होती.

17 वर्षीय संशयिताचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी दोन महिन्यांपूर्वी एका व्हॉट्सॲप ग्रुपवर आलिशान कारचा फोटो शेअर केला होता, त्यात सुरेंद्र अग्रवाल यांनी ही कार नातवाच्या वाढदिवसाची भेट असल्याचे सांगितले होते, अशी माहिती सुरेंद्र अग्रवाल यांचे मित्र अमन वाधवा यांनी दिली आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडे टीव्हीने दिले आहे.

पोर्श अपघातामुळे सुरेंद्र अग्रवाल यांना त्यांच्या ड्रायव्हरला धमकावल्याच्या आणि त्याने अपघात केल्याचा खोटा दावा करण्यासाठी जबरदस्ती केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. या ड्रायव्हरला अग्रवाल यांनी दोन दिवस त्यांच्याच घरी डांबून ठेवले होते. त्यानंतर ड्रायव्हरची पत्नी आणि नातेवाईकांनी त्याला वाचवले.

या प्रकरणाच्या पुढील तासानंतर याती गुंतागुंत समोर येत आहे. ड्रायव्हरचा मोबाईल फोन गायब असून, अग्रवाल यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान सुरेंद्र अग्रवाल यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोर्शे क्रॅशमध्ये कथितरित्या सहभागी असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचे वडील आणि आजोबा यांनी त्यांच्या ड्रायव्हरला रोख रक्कम आणि अनेक वस्तू देण्याचे आमिष दाखवत अपघाताची जबाबदारी घेण्याची धमकी दिली, असे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले होते.

या सर्व घटना समोर आल्यानंतर ड्रायव्हर आणि त्याच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात येणार असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा