You are currently viewing कास मारहाण प्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता…

कास मारहाण प्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता…

कास मारहाण प्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता…

सावंतवाडी

मारहाण प्रकरणी कास येथील दोघांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. नागेश भाईप व विशांत भाईप अशी त्यांची नावे आहेत. २९ मार्चला फिर्यादी तेजस्विनी भाईप यांच्या घरासमोर दोघांनी आपसात संगनमत करून जमीन मोजणीच्या वेळी लावलेला निस उचलला होता. या कारणावरून झालेल्या वादानंतर मारहाण केली होती. तसेच फिर्यादी हिला शिवीगाळ करून सार्वजनिक शांतता भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती वरून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या कामी ॲड. अनिल केसरकर यांनी युक्ति वाद केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा