समुद्रात वादळसदृश्य स्थिती ; २५ मे नंतर जलक्रीडा बंद करण्याचा शासनाचा निर्णय योग्यच
जेष्ठ पर्यटन व्यवसायिक दामोदर तोडणकर यांची माहिती
मालवण :
समुद्रात वादळ स्थिती निर्माण झाली असून त्याचे पडसाद सिंधुदुर्ग किनारपट्टी दिसून येत आहे. वादळी वातावरणामुळे जलक्रीडा व्यवसायावर परिणाम झाला असून किनारपट्टीवरील हे चित्र पाहता सुरक्षेच्या दृष्टीने २५ मे नंतर जलक्रीडा बंद करण्याचा शासनाचा निर्णय योग्य असल्याचे मत मालवण येथील जेष्ठ पर्यटन व्यवसायिक दामोदर तोडणकर यांनी व्यक्त केले आहे.
तोडणकर म्हणाले, पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मालवण येथे लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात. वॉटर स्पोर्ट्स (जलक्रीडा) पॅरासेलिंग, स्कुबाडायविंग, बोटिंग आदी प्रकाराला पर्यटक पसंती देतात. मात्र सागरी वातावरण अशांत असल्याने त्याचा परिणाम जलक्रीडा व्यवसायावर झाला आहे. सुरक्षा उपाययोजना म्हणून दरवर्षी २५ मे नंतर पावसाळी हंगामात जलक्रीडा बंद करण्याचा निर्णय शासन घेते. यावर्षी हा निर्णय योग्यच असल्याचे चित्र आहे. असे तोडणकर म्हणाले. यावर्षी अपेक्षित पर्यटन नव्हते. मे महिना अखेर पर्यटक मोठया संख्येने मालवण येथे दाखल झाले. मात्र सागरी हवामानातील बदल, वारे पाऊस यामुळे पर्यटनावर परिणाम झाला. तसेच दोन दिवस लाईट नसल्याचा परिणामही मालवणच्या पर्यटनावर झाला. असेही दामोदर तोडणकर यांनी सांगितले.