You are currently viewing बुद्धा गौतमा

बुद्धा गौतमा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बुद्धा गौतमा*

 

बुद्धा गौतमा

तू बुद्ध नि मी निर्बुद्ध

तू सत्यवादी

नि मी असत्यवादी

तू सत्योपासक

आणि मी तुझा उपासक

निर्बुद्ध असत्यवादी

असूनही तुझीच करतो

उपासना आराधना

आणि या विश्वात

स्वतःला

तत्ववादी बुद्धिवादी

म्हणून मिरवतो

 

गौतमा बुद्धा

खरे तर

तुझा पाईक होण्याची

माझी लायकीही नाही

कारण

मला बुद्ध कळला कुठे?

कळणारही नाही

बुद्ध समजण्यासाठी

त्याग करून

बुद्ध व्हावे लागते

आचरण बदलावे लागते

माझ्यात बदलाची क्षमता

आहे तरी कुठे?

सर्वस्वाच्या त्यागाचा

ऐश्वर्य वैभवापासून

दूर जाण्याचा

मी विचारही करू शकत नाही

मग बुद्ध होणे दूरच

बुद्धाचा पाईकही कसा होईल?

 

गौतमा बुद्धा

मला बुद्ध हवाय

पण

दुसर्‍यांना शिकवण्यासाठी

त्यांच्या अज्ञानाचा

फायदा घेऊन

माझ्यातला बुद्ध

प्रदर्शनात मांडण्यासाठी

किंबहुना मीच

बुद्धाचा बोधिसत्व बोधीवृक्षाचा

उपासक अनुयायी

प्रचारक प्रसारक म्हणून

जगाला दर्शवण्यासाठी. …

 

बुद्धा गौतमा

माझ्यात तुझा

एक तरी गुण

असू दे दिसू दे…

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*( चांदवडकर ) धुळे.*

*7588318543.*

प्रतिक्रिया व्यक्त करा