You are currently viewing जपून ठेवावे

जपून ठेवावे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जपून ठेवावे*

 

काही प्रसंग

जपून ठेवावे ह्रदयात

आधार देतात

मनाला….

 

बालपण आठवणीत

सदैव असते जपून

सांडते कुपीतून

अत्तर….

 

सुखदुःखाचे धागे

विणताना होते यातायात

कितीतरी मनात

उलथापालथ…

 

जपून ठेवावेत

आयुष्यातील स्वप्न सप्तरंगात

बुडावे आभासात

आनंदाने….

 

जपून ठेवावे

नात्यातील रेशमी अनुबंध

दृढ संबंध

कुटुंबात….

 

जपून ठेवावे

निसटलेले काही क्षण

आर्त मन

विरहात….

 

जपावे क्षण

पुन्हा येत नाहीत

ठेवावे उजळणीत

पुनश्च….।।

 

 

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा