कणकवली तालुक्याचा बारावीचा 98.17 टक्के निकाल…
परेश मडव याने पटकावला तालुक्यात प्रथम येण्याचा मान.
कणकवली
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा मंगळवारी दुपारी 1 वाजता अाॅनलाईन निकाल जाहीर केला. कणकवली तालुक्याचा 98.17 टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेसाठी 2025 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 1988 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कणकवली ज्यु. काॅलेजच्या विज्ञान शाखेचा विद्यार्थी परेश सतीश मडव याने 94.83 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. कणकवली काॅलेजच्या वाणिज्य शाखेचा विद्यार्थी चिन्मय दिलीप शेळके याने 92.67 टक्के गुण मिळवून द्वितीय तर कनेडी ज्यु. काॅलेजच्या विज्ञान शाखेची विद्यार्थिनी विज्ञानी राजेश प्रभू हिने 92.33 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
कणकवली काॅलेज कणकवलीच्या विज्ञान शाखेचा 99.06 टक्के, कला शाखेचा 88.76 टक्के, वाणिज्य शाखेचा 99.56 टक्के, व्यावसायिक शाखेचा 95.45 टक्के निकाल लागला आहे. एस.एम.हायस्कूलच्या विज्ञान शाखेचा 100 टक्के, वाणिज्य शाखेचा 95.83 टक्के, व्यावसायिक शाखेचा 96.29 टक्के निकाल लागला आहे. खारेपाटण ज्युनिअर काॅलेजच्या विज्ञान, कला, वाणिज्य या शाखांचा 100 तर व्यावसायिक शाखेचा 95. 23 टक्के निकाल लागला आहे. न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या विज्ञान शाखेचा 98.78 टक्के, कला शाखेचा 92.59 टक्के, वाणिज्य शाखेचा 100 टक्के, व्यावसायिक शाखेचा 100 टक्के निकाल लागला आहे. कळसुली ज्यु. काॅलेजच्या कला शाखेचा 100 टक्के, वाणिज्य शाखेचा 97.43 टक्के निकाल लागला आहे. कासार्डे ज्यु. काॅलेजच्या विज्ञान, कला, वाणिज्य या शाखांचा 100 टक्के निकाल लागला आहे. वामनराव महाडिक ज्यु. काॅलेजचा कला शाखेचा 87.09 टक्के, वाणिज्य शाखेचा 100 टक्के निकाल लागला. कनेडी ज्यु. काॅलेजच्या विज्ञान, कला, वाणिज्य या शाखांचा 100 टक्के निकाल लागला आहे. कै. राजाराम मराठे ज्यु. काॅलेजच्या विज्ञान शाखेचा 100 टक्के निकाल लागला आहे. मालंडकर ज्यु. काॅलेजच्या वाणिज्य शाखेचा 100 टक्के निकाल लागला. बीडवाडी ज्यु. काॅलेजच्या वाणिज्य शाखेचा 93.54 टक्के निकाल लागला आहे. आडियल ज्यु. काॅलेजच्या 100 टक्के निकाल लागला आहे.