You are currently viewing वामनराव महाडिक महाविद्यालयातून बारावी बोर्ड परीक्षेत कला शाखेची साक्षी नेवरेकर तर वाणिज्य शाखेचा सिद्धार्थ जठार प्रथम

वामनराव महाडिक महाविद्यालयातून बारावी बोर्ड परीक्षेत कला शाखेची साक्षी नेवरेकर तर वाणिज्य शाखेचा सिद्धार्थ जठार प्रथम

*महाविद्यालयाचा निकाल ९८.२१%*

 

तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित, वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळरे येथील विद्यार्थ्यांनी आजच (मंगळवार,दि.21 मे) संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या एच.एस.सी.बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले.

त्यामध्ये विद्यालयातील कला शाखेचा निकाल 96.42% तर वाणिज्य शाखेचा निकाल 100% लागला आहे.वाणिज्य शाखेच्या सिद्धार्थ यशवंत जठार याने 91% गुण मिळवत विद्यालयात दोन्ही शाखांमधून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

विद्यालयातील कला शाखेतून अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक असे:

1)साक्षी संजय नेवरेकर, 476 गुण 79.33 %

2) कोमल सत्यवान कांजीर, 435 गुण 72.50 %

3)सुस्मिता पांडुरंग गुरव, 407 गुण 67.83%.

*वाणिज्य शाखेतून अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक:*

1) सिद्धार्थ यशवंत जठार 546 गुण, 91 %

2) तन्वी महेंद्र कदम 486 गुण, 81%

3) दीक्षा आत्माराम जाधव 445गुण, 74.17% .

तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा चिटणीस श्रीकृष्ण तुकाराम खटावकर, शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन अरविंद महाडिक, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, प्राचार्य अविनाश मांजरेकर,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवृंद, आजी-माजी सर्व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांचेकडून यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा