_*भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची इन्फिप्री व अन्नपूर्णा टेक रिसोर्समध्ये निवड….*_
सावंतवाडी
येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची इन्फिप्री आयटी सोल्युशन्स, गोवा व अन्नपूर्णा टेक रिसोर्स, उद्यमनगर माजगाव या कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड करण्यात आली आहे._
_कॉलेजच्या डिप्लोमा विभागातील तृतीय वर्ष कॉम्प्युटर शाखेच्या विद्यार्थ्यांचे कॅॅम्पस इंटरव्हयू या दोन्ही कंपन्यांतर्फे घेण्यात आले होते. यामध्ये इन्फिप्री आय टी सोल्युशन्स, गोवा या कंपनीमध्ये ४ विद्यार्थ्यांची माहिती तंत्रज्ञान सहाय्यक अभियंता व ५ विद्यार्थ्यांची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यात आली. तसेच अन्नपूर्णा टेक रिसोर्स, उद्यमनगर, माजगाव या कंपनीमध्ये ४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सध्या आयटी क्षेत्र झपाट्याने विस्तारत असून आता पुणे-मुंबई सोबतच गोवा व स्थानिक पातळीवर देखील मोठ्या प्रमाणावर संगणक अभियंत्यांची आवश्यकता भासत आहे. या अनुषंगाने कॉलेजने विविध आयटी उद्योगांशी सामंजस्य करार केलेले असून त्यामधून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत असल्याचे कॉलेजचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा.मिलिंद देसाई यांनी सांगितले._
_यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले व विभाग प्रमुख प्रा.प्रशांत काटे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या._