*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
जागतिक मधमाशी दिनाच्या शुभेच्छा!
*”मधमाशी”*
मधमाशी मनुष्यास सृष्टीचे अलौकिक देणं
दत्तगुरूंनी मानले माशीला गुरु समानIIधृII
मधमाशीला आहेत चार पंख सहा पाद
स्पर्श संवेदी केस संयुक्त नेत्र साधे नेत्र
रुची इंद्रिय ज्ञानेन्द्रिय असतात मुखांतII1II
मधमाशांमुळे नैसर्गिक होते परागीभवन
कृषक सर्वांचे मैत्र वाढवे कृषी उत्पादन
चराचरा पासून तिचे अस्तित्व पुरातनII2II
चोखती गोड रस सर्वथा देती शुद्ध मध मेणं
ऊर्जा दाती गुणकारी आयुर्वेदिक औषध
मध आरोग्य दायी आहे नैवेद्यातील अमृतII3II
निरंतर गोळा करी मध राखी पर्यावरण
शिकवे संचयाचे महत्त्व निष्ठेन समर्पण
राहू कृतज्ञ तिचे करू संवर्धन संगोपनII4II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410301.Cell.9373811677