You are currently viewing इवलेसे रोप

इवलेसे रोप

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूहाच्या सन्माननीय सदस्य कवयित्री सौ मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*इवलेसे रोप* 

 

इवलेसे रोप प्राजक्त

लावियले द्वारांगणी

बहरला,असा मस्त

शुभ्र नक्षी अंगणी.

 

धवल कोमल पाकळ्या

देठ केशरी केशरी

ताजी ताजी प्राजक्त फुले

डोलती शीत पवनावरी.

 

रात्रभर लखलखती

नक्षत्रेच जणु वृक्षावरी

दिनमणी उगवता

समर्पण धरणीवरी

 

वा-यावरी दरवळे

मंद मंद सुगंध

चैतन्य, मांगल्यमय

परिसरी मधुगंध

 

फांदीवरून पडतांना

मोह सोडे,क्षणभंगुर जीवन

आनंद उत्साह वाटे

छान देई शिकवण.

 

सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा