You are currently viewing अनिल कदम अपघात मृत्यू प्रकरणी जाणवली ग्रामस्थांचा रास्ता रोको…

अनिल कदम अपघात मृत्यू प्रकरणी जाणवली ग्रामस्थांचा रास्ता रोको…

अनिल कदम अपघात मृत्यू प्रकरणी जाणवली ग्रामस्थांचा रास्ता रोको…

महामार्ग पाच किलोमीटर “ब्लाॅक”

कणकवली

मुंबई गोवा महामार्गावर जाणवली प्राथमिक शाळेलगत काल बौद्धवाडी येथील अनिल कृष्णा कदम यांचा अपघाती मृत्यू झाला होता. कदम यांना धडक देऊन पसार झालेल्या कारचा अद्याप शोध लागलेला नाही. तसेच जाणवली परिसरात वारंवार अपघात होऊन येथील नागरिकांचे बळी जात आहेत. या विरोधात एकवटलेल्या ग्रामस्थांनी दुपारी अकरा वाजल्यापासून रास्ता रोको सुरू केला आहे.
अनिल कदम यांना धडक देऊन प्रसार झालेल्या कारचालकाचा तातडीने शोध घ्यावा अन्यथा मयत कदम यांचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही असा इशारा देऊन जाणवली वासियांनी मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. या ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्यासह अन्य अधिकारी पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत. मात्र फरार कार चालकाचा शोध लागत नाही. तसेच जाणवली परिसरात होणारे अपघात टाळण्यासाठी उड्डाणपुलाची व्यवस्था होत नाही किंबहुना उड्डाणपूल होण्याबाबत ठोस आश्वासन मिळत नाही. तोवर रास्ता रोको सुरूच ठेवण्याचा निर्धार जाणवली ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा