You are currently viewing 1 जून ते 31 जुलै कालावधीत मासेमारी बंदी

1 जून ते 31 जुलै कालावधीत मासेमारी बंदी

1 जून ते 31 जुलै कालावधीत मासेमारी बंदी

सिंधुदुर्गनगरी

 भारताच्या पूर्व किनारपट्टीवर मान्सुनचे आगमन लवकर होत असल्याने या किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी दि.१५ एप्रिल २०२४ ते दि.१४ जुन २०२४ (दोन्ही दिवस धरुन) तसेस पश्चिम किनारपट्टीवर मान्सुनचे आगमन उशिरा होत असल्याने पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी दि. १ जून २०२४ ते दि.३१ जुलै २०२४ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) पावसाळी मासेमारी बंदी घोषीत केली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) सा.वि.कुवेसकर यांनी दिली आहे.

मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांची जिवीत व वित्त यांचे रक्षण करण्याच्या हेतुने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ च्या कलम ४ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, रचना केलेल्या सल्लागार समितीशी विचार विनिमय करून शासन आदेश दि.१ जून २०१५ अन्वये १ जून ते ३१ जुलै (दोन्ही दिवस धरून) राज्याच्या जलधी क्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदी कालावधीचे नियमन करण्यात आलेले असून सदरच्या आदेशान्वये परवानाधारक बिगर- यंत्रचालित नौकास मासेमारीची मुभा दिलेली आहे.

या कालावधीत मासळीच्या जिवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीज निर्मिती प्रक्रियेस वाव मिळुन मासळीच्या साठयाचे जतन होते. तसेच या कालावधीत खराब / वादळी हवामानामुळे होणारी मच्छीमारांची जिवीत व वित्त हानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते. सबब, मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांचे जिवीत व वित्त यांचे रक्षण या हेतुने या वर्षी दि.१ जून २०२४ ते दि.३१ जुलै २०२४ या कालावधीत (दोन्ही दिवस धरून) राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासुन १२ सागरी मैलापर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात येत आहे,

 पावसाळी मासेमारी बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील. पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचालित नौकांना लागु राहणार नाही.  समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका दि.०१ जून २०२४ पूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक आहे. तसेच दि.३१ जुलै २०२४ वा त्यापुर्वी समुद्रात मासेमारीकरीता जाता येणार नाही याची नोंद घ्यावी. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनाऱ्यापासुन १२ सागरी मैलापुढे) खोल समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या नौकांस केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे धोरण/ मार्गदर्शक सुचना/आदेश लागु राहतील.

 राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनान्यापासुन १२ सागरी मैलापर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना आढळल्यास / केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा), २०२१ च्या कलम १४ अन्वये नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल तसेच कलम १७ मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शास्ती लादण्यात येईल.  पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही. पावसाळी बंदी कालावधीमध्ये राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकास अवागमन निषिध्द आहे. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासुन १२ सागरी मैलापर्यंत) पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकेने बेकायदेशीर मासेमारी न करणेबाबत आपले अधिनस्त सर्व मच्छीमार सहकारी संस्थास अवगत करावे तसेच बंदी कालावधीत आपल्या कार्यक्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकेने बेकायदेशीर मासेमारी केली जाणार नाही / पावसाळी मासेमारीचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा