*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य श्री.संजय धनगव्हाळ यांनी केलेले श्री सुभाष उमरकर यांच्या काव्याचे रसग्रहण*
*सुभाष उमरकरांची मला आवडलेली आयुष्याशी निगडीत जगणं मरणं समजावून सांगणारी कवितेच विश्लेषण करण्याचा हा छोटासा प्रयत्न*
*तर कवी असं म्हणतात की*
****************************
*खेळ नाही आयुष्य*
*सहज खेळता येईल*
*जगणं नाही सोपं*
*की सहज मरता येईल*
खरं आहे ना सहज खेळता येईल इतकं आयुष्य सोपं नसतं कारण आपलं आयुष्य अनेकांशी जोडलेलं असतं .अनेकांच्या भावनांची तार अनेकांच्या मनाशी बांधली गेली असते.आयुष्य जगताना अनेक स्वप्ने,अपेक्षा घेऊन माणूस जगत असतो अनेक अडचणी असतात, समस्या असतात खूप काही करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो.आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगण्याची धडपड करत असतो आपल्यासाठी अनेकजण जगत असतात आपल्याला अनेकांसाठी जगायचं असतं तेव्हा जगणंही सहज सोप नसतं.अनेक अडचणींवर मात करता करता आयुष्याचा कधी कधी कंटाळा येतो पण मरणही सहज सोपं नसतं.आयुष्य जगण्या इतकेच मरणही कठीण असतं.
*खूप आहे खाच खळगे*
*म्हणे चंद्राच्या पृष्ठभागावर*
*दुरून दिसतो सुदंर*
*असेच आहे जीवन*
प्रत्येक व्यक्ती काही चंद्रावर जाऊन शकत नाही पण जे गेलेत त्यांनी चंद्राचा पृष्ठभाग पाहीला आपण ही टिव्ही वर बघितला तिथला भाग ओबडधोबड असला तरी खूप सुंदर दिसतो.माणसाच ही असचं असतं वरवर दिसणार माणसाचं व्यक्तिमत्त्व खरच सुंदर असतं म्हणून माणसाने जगलं पाहिजे.जगण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही जो स्वच्छंदी जगला तो खऱ्याअर्थाने त्याच जगणं सुंदर करतं असतो.
*भीती ज्याला मरणाची*
*तो जगायला धडपडतो*
*असतो जो मनमौजी*
*मरणाला मित्र समजतो*
खत तर मरणाची भीती प्रत्येकाला असते म्हणून माणुस काही जगणं सोडत नाही.मरणाची भितीच माणसाला जगणं शिकवते.ज्याला जगणं समजले तो कोणत्याही परिस्थितीत मरणाचा विचार करत नाही.शेवटी आयुष्याचा शेवट असणारच असतो.मग भित भित जगण्या पेक्षा मनमौजी होऊन जगायला काय हरकत आहे.जन्माला आलेली काही माणसं आयुष्यात काहीतरी चांगल काम करून मरण्यासाठी धडपडत असतात आपण समाजाचं काहीतरी देणं लागते ही जाणिव ज्याला होत असते.अशी माणसं मरणाला मित्र समजतात. कारण मरायच तर काहीतरी किर्ती करून मारायचं म्हणून अशी बरीच माणसं आपल्या अवतीभवती आहे की ते मनमौजी होऊन मृत्यूशी मैत्री करून जगत असतात.अशांचच आयुष्य खऱ्याअर्थाने जगण्याशी एकरूप असतं.
*एक वेळा तरी जगावं*
*फुलपाखराच जीणं*
*तेव्हाच कळेल माणसाला*
*आयुष्य आहे सोनं*
जगामध्ये काही माणसं जगायचं म्हणून जगतातच जन्माला आलो आहोत ना मगं कसं तरी आयुष्यात घालवतात आणि निरसपणे जगातात.काही घेणं देणं नसतं जगाशी आशा माणसांना म्हणून कवि म्हणतात की फुलपाखराच जीणं एकदा तरी जगलं पाहिजे.कारण फुलपाखरू देहभान विसरून जगत असतो.त्याच्या सभोवताली जे जे सुदंर दिसेल ते सौंदर्य टिपण्यासाठी फुलपाखरू इथून तिथे पळत असते.म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात फुलपाखरू त्याच जगणं शोधत असतो.सैरभैर होऊन ते फुलपाखरू जगण्याचा आनंद घेत असतो.समोर आनंदाचा डोह असताना त्यात जर डुबकी मारली नाही.तर त्याला जगण्याचा आनंद कसा अनुभवता येईल.म्हणून आयुष्याचं सोनं करून घेण्यासाठी माणसाने फुलपाखरा सारखं जगायला हवं थोडक्यात काय तर फुलपाखरू होऊन जगावं तर आयुष्याचं सोनं होतं
*काय आहे सुगंध*
*फुलाला कळत नाही*
*जगण्यातला खरा अर्थ*
*मरणाऱ्याला कळतं नाही*
सुगंधाचा गंध फक्त माणसालाच कळतो म्हणून प्रत्येक व्यक्तीला फुला पेक्षा सुगंधाच आकर्षण जास्त असतं. फुलाला जर सुगंध कळला असता तर त्या फुलाचं छंद कुणालाही लागला नसता.हरणाच्या बेंबीत कस्तुरी असुनही हरणाला माहीत नसते अगदी तसचं फुलांच्या बाबतीत सांगता येईल सुगंध निर्माण करणाऱ्यां फुलांना त्यांचा सुगंध कळत नाही तरी ते सुंगंध देऊन जगत असतात.म्हणून एक टवटवीत फुलाला पाहून माणसाचं आयुष्य बदलून जातं.गोडं गोंडस फुलाला पाहून नकळतपणे गालावर हसु फुलते.जगण्याच्या आंनदी लहरी आयुष्याला सुगंधीत करत असतात एव्हढ सारं काही चांगल आयुष्य असतानाही माणसाला जगणं कळत नाही.सुगंध आणि आनंद समजून घेण्यासाठी जगणं खूप महत्त्वाचे आहे.ज्याने जगण्याला समजून घेतलं त्याला मरणाची भिती नसते म्हणून माणसाने जगलं पाहिजे.
*मरण जरी अटळ सत्य*
*फक्त जिवंतपणी कळतं*
*मरण्याच्या भितीने खरचं*
*कोण जगणं सोडतं*
या जगात सत्य काही असेल तर ते म्हणजे मरणं.आणि सत्य नाकारुन चालत नाही.मरणाची तारीख निश्चित असते.काही जरी झालं तरी मरण टळत नाही.मग असं असताना या क्षणभंगुर आयुष्यात जो जगला नाही त्यांच्या जगण्याला काय अर्थ.प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे की.एकना एक दिवस मरावं लागणारच आहे.मग मरणाची भिती घेऊन कशाला जगायचं जगणं सोपं नसलं तरी जगणं सुदंर आहे.धडपडत का होईना माणसाने जगायचं.जगण्याचा आनंद घ्यायचां मरणाला मित्र करून आयुष्याच सोनं करून जगायचं.मरणाच्या भितीने फुलासारखं सुगंधीत आयुष्य उगाच काट्यांसारख बोचर कशाला कराचं
मरण्यासाठी जगण्या पेक्षा जगण्याला काहीतरी अर्थ प्राप्त होईल असं जगलात तर मेल्यानंतरही जगण्याचा सुगंध दरवळत राहीलं.कारण मरणाला न घाबरता आयुष्याच सोनं झालेलं असतं.
खरचं सुभाष उमरकरांच्या लेखणीतून सहजपणे लिहिली गेलेली अर्थपूर्ण माणसाचं जगणं समजाऊन सांगणारी अप्रतिम कविता मरणाशी मैत्री करायला भाग पाडते.म्हणजे जगण्या मरणाचा लेखाजोखा उमरकरांच्या कवितेत दिसुन येतो.अतिशय हलकीफुलकी काळजाला भिडणारी मला भावलेली कविता वाचताना रहावले गेले नाही म्हणून मी सुभाष उमरकारांची परवानगी न घेता त्यांच्या कवितेच विश्लेषण करण्याचा आगाऊपणा केला.
*संजय धनगव्हाळ*
*अर्थात कुसुमाई*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७