You are currently viewing स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांनी अभ्यासिकेचा (ग्रंथालय) लाभ घ्यावा

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांनी अभ्यासिकेचा (ग्रंथालय) लाभ घ्यावा

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांनी अभ्यासिकेचा (ग्रंथालय) लाभ घ्यावा

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांचे मार्फत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता सुसज्य ग्रंथालय उपलब्ध आहे. सदर ग्रंथालयामध्ये युपीएससी, एमपीएससी, सरळ सेवा, पोलीस भरती या सारख्या विविध स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध आहेत सदर ग्रंथालय सेवेचा निशुल्क लाभ इच्छुक उमेदवार घेऊ शकतात. अशी माहिती सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांनी दिली आहे.

 विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सुसज्य व अद्यावत हॉल, स्वच्छ व शांत वातावरण, मुलींसाठी स्वतंत्र अभ्यास कक्ष, ग्रुप स्टडी साठी कक्ष, स्पर्धा परीक्षेची पुस्तके, अनुभवी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, नामांकित वर्तमान पत्रे व मासिके, संगणक सुविधा, वाय-फाय सुविधा उपलब्ध आहेत. अभ्यासिके मध्ये प्रवेश घेण्याकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग प्रशासकीय संकुल, तळ मजला ब्लॉक-अ, सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ जि- सिंधुदुर्ग. ०२३ ६२२२८८३५ येथे संपर्क साधावा, असे आवाहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा